Home लेटेस्ट मराठी न्यूज WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा whatsapp-business-chat services...

WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा whatsapp-business-chat services customers-to-be-charged-for-services mhkb | Technology


WhatsApp ने काही दिवसांपूर्वी एक नवं फीचर WhatsApp Business अकाउंट अँड्रॉईड युजर्ससाठी रोलआउट केलं होतं. सध्या व्हॉट्सअप बिजनेसचे पाच कोटीहून अधिक यूजर्स आहेत.

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप WhatsAppने नवी घोषणा केली आहे. व्हॉट्सअपने, आपल्या बिजनेस चॅट सर्व्हिससाठी कंपन्यांवर चार्ज लावण्यास सुरुवात करणार असल्याचं, गुरूवारी एका ब्लॉग पोस्टद्वारे सांगितलं. सध्या व्हॉट्सअप बिजनेसचे पाच कोटीहून अधिक यूजर्स आहेत. या बिझनेस चॅट सर्व्हिससाठी किती चार्ज लागणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. WhatsApp ने काही दिवसांपूर्वी एक नवं फीचर WhatsApp Business अकाउंट अँड्रॉईड युजर्ससाठी रोलआउट केलं होतं.

WhatsApp ने ब्लॉग पोस्टमध्ये काय म्हटलंय?

व्हॉट्सअपने पाच कोटीहून अधिक बिजनेस युजर्ससाठी, पे-टू मेसेज ऑप्शनची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, ‘आम्ही बिजनेस ग्राहकांसाठी चालू असलेल्या काही सेवांवर शुल्क आकारणार आहोत, जेणेकरून आपल्या इतर दोन अब्जाहून अधिक ग्राहकांना मोफत एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड टेक्स्ट, व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंगसारख्या सुविधा उपलब्ध करू शकू.’-

(वाचा – देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य; UIDAI ने दिली संपूर्ण माहिती)

छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत –

व्हॉट्सअपने बिजनेस करणाऱ्या युजर्ससाठी WhatsApp Business हे वेगळं ऍप सुरू केलं आहे. हे असं मार्केट प्लेस आहे, जिथे चॅटद्वारे लोक बिजनेस करू शकतील. आता या प्लॅटफॉर्मवर लवकरच डायरेक्ट शॉपिंग करण्याचं नवं फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने छोट्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी मदत मिळणार असल्याचं, व्हॉट्सअपने सांगितलं आहे. कंपनीने आपल्या बिजनेस युजर्सला या नव्या फीचरसाठी नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली आहे.

(वाचा – WhatsApp मध्ये Always Mute चा ऑप्शन; ग्रुपचं नोटिफिकेशन कायमचं बंद होणार)

डेटा फेसबुकवर शेअर केला जाणार –

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बिजनेस आणि ग्राहक दोघांना जागरूक करण्यासाठी, एखाद्या स्पेशल केसमध्ये त्यांचा डेटा फेसबुकवर शेअर केला जाईल. त्याशिवाय, फेसबुक होस्टिंग सोल्यूशनसाठी एडिशनल पेमेंटची आवश्यकता असणार आहे.

व्हॉट्सअप युजर्सला दिली जाणारी फेसबुक होस्टिंग सर्व्हिस एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. म्हणजे बिजनेस ग्राहकांमधील मेसेज कोणीही दुसरा व्यक्ती पाहू शकणार नाही. यासंबंधी संपूर्ण विचार करण्यात आला असून, येथे होणाऱ्या बिजनेसमध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.


Published by:
Karishma Bhurke


First published:
October 24, 2020, 12:36 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular