Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra Vinod Tawde on MLC Nomination: विधान परिषदेचं तिकीट मागितलंच नव्हतं: विनोद तावडे...

Vinod Tawde on MLC Nomination: विधान परिषदेचं तिकीट मागितलंच नव्हतं: विनोद तावडे – never ask for mlc nomination, says former minister vinod tawde


मुंबई: ‘विधानसभेसाठी मला तिकीट नाकारण्यात आलं होतं हे खरं आहे. पण विधान परिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती. उलट मला नको, असं मीच सांगितलं होतं. त्यामुळं माझ्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असा खुलासा भाजपचे नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. (Vinod Tawde on MLC Nomination)

खडसेंच्या विरोधातील प्लान दिल्लीतला: पृथ्वीराज चव्हाण

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. खडसे, राम शिंदे अशा सर्वांनीच आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तर, काँग्रेसनं खडसे यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर तावडे यांनी एका न्यूज वेबसाइटशी बोलताना त्यांची भूमिका मांडली. खडसे, मुंडे यांच्या नाराजीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. ‘एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या तिकिटाची अपेक्षा होती. त्यामुळं त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र, तिकीट नाकारलं म्हणजे पक्षानं सर्वस्वी दूर केलं असं होत नाही. एकनाथ खडसे किंवा पंकजाताई यांच्या कामाबद्दल भाजपच्या नेतृत्वाला आदरच आहे. त्यांना आज ना उद्या संधी मिळेल,’ असं तावडे म्हणाले.

Live: नागपूरमध्ये क्वारंटाइन केलेल्या युवकाची आत्महत्या

‘त्या’ दोघांनी मिळून तिकीट कापलं नाही!

‘विधानसभेच्या असेल किंवा आता विधान परिषदेच्या उमदेवारीबद्दल जे काही निर्णय झाले, ते भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेले आहेत. खरंतर फडणवीस व चंद्रकांत पाटील हे आम्हाला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते. मात्र, केंद्रीय संसदीय मंडळानं वेगळा निर्णय घेतला. त्यामुळं त्या दोघांनी मिळून आमचं तिकीट कापलं असं वाटत नाही,’ असं तावडे म्हणाले.

थोरातांना ती संधी मिळणार नाही!

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. त्यावरही तावडे यांनी मत मांडलं. ‘अनेक वर्षे काम करून वाढवलेला पक्ष खडसे सोडणार नाहीत. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल. त्यामुळं थोरातांना त्यांच्या स्वागताची संधी मिळणार नाही,’ असं तावडे म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular