Home मनोरंजन VIDEO: शिल्पा शेट्टीने केलं कुमारिका पूजन; म्हणाली, "आमच्या घरीच आहे आमची छोटीशी...

VIDEO: शिल्पा शेट्टीने केलं कुमारिका पूजन; म्हणाली, “आमच्या घरीच आहे आमची छोटीशी देवी” Shilpa-shetty-kundra-s-kumarika-poojan-at-this-navratri-with-her-daughter-samisha-mhaa | News


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ने नवरात्रीनिमित्त 8 कुमारीकांचं पूजन केलं आहे. कुमारीका पूजनाचा व्हिडीओ शिल्पाने शेअर केला आहे.

मुंबई, 24ऑक्टोबर: सध्या संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्साह आहे. सर्वच भाविक आप-आपल्या परीने देवीची उपासना करत आहेत. यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)ने देखील नवरात्रीनिमित्त 9 कुमारीकांची पूजा केली. तसंच शिल्पाने आपली मुलगी समिशाला सुद्धा सुंदररित्या सजवलं आहे. शिल्पा शेट्टीने तिने केलेल्या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती संपूर्ण पूजा करताना दिसत आहे. छोट्या समिशाच्या पायालाही कुंकू लावून तिची पूजा केली आहे. तसंच इतर आठ कुमारींकांचीही यथायोग्य पूजा केलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाचा नवरा राज कुंद्रा आणि तिची बहीण शमिता शेट्टी दिसत आहेत.

View this post on Instagram

On the auspicious occasion of Ashtami today, we were fortunate and blessed with our very own DEVI , Samisha her first Navratri, so performed the Kanya Pooja, with her and 8 little girls, welcomed with all precautions taken ‍♀️ Our way of paying gratitude to the Supreme Goddess Maha Gauri today and her nine divine forms. This year, however, we masked up and did the Pooja keeping all the safety measures in mind, nevertheless, a beautiful feeling to serve and pamper these little girls❤️ Jai Mata Di @rajkundra9 @shamitashetty_official . . . . . #HappyNavratri #Ashtami #KanchikaPooja #KanjakPooja #blessed #gratitude #DurgaMaa #JaiMataDi

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

या व्हिडीओला शिल्पाने छानसं कॅप्शनही दिलं आहे. यात शिल्पा म्हणते, “नवरात्रीनिमित्त कुमारींकांचं पूजन करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे. समिशाची ही पहिलीच नवरात्र आहे. त्यामुळे शमिशासाठी आणि आमच्यासाठी ही नवरात्र खूपच खास आहे.  मी तिची आणि 8 कुमारीकांची पूजा केली.”


Published by:
Amruta Abhyankar


First published:
October 24, 2020, 9:56 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular