Home लेटेस्ट मराठी न्यूज India VIDEO: 'माँ तुझे सलाम’चं एवढं गोड व्हर्जन तुम्ही ऐकलं नसेलच, 4 वर्षांची...

VIDEO: ‘माँ तुझे सलाम’चं एवढं गोड व्हर्जन तुम्ही ऐकलं नसेलच, 4 वर्षांची Esther जिंकतेय नेटिझन्सनी मनं | Viral


मिझोरमची चार वर्षांची चिमुरडी Esther Hnamte सध्या इंटरनेटवर लोकप्रिय होत आहे. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान याच्या ‘माँ तुझे सलाम’ या गाण्याचा Esther Hnamte चा व्हिडीओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे.

मिझोरम, 02 नोव्हेंबर : मिझोरमची चार वर्षांची चिमुरडी Esther Hnamte सध्या इंटरनेटवर लोकप्रिय होत आहे. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान याच्या ‘माँ तुझे सलाम’ या गाण्याचा Esther Hnamte चा व्हिडीओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या गाण्याच्या या व्हिडीओमध्ये मिझोरमच्या निसर्गरम्य सौंदर्याची झलकही दिसते आहे. हातात तिरंगा घेऊन क्यूट असा स्कर्ट-टॉप घातलेली ही चिमुरडी फारच गोंडस दिसते आहे. तिने गाणं गाताना मिझोरमची पारंपरिक वेषभुषाही केली आहे. तिच्या गाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे.

‘प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण भारतीय आहोत याचा अभिमान बाळगा. प्रेम, काळजी आणि आपुलकी ही या भूमीची मूल्यं आहेत. या देशात भाषा, संस्कृती, जीवनशैली यात खूपच विविधता आहे. अशी विविधता असतानाही मातृभूमीच्या चांगल्या मुलामुलींप्रमाणे आपण एकत्र राहुया’,  असं या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं आहे.

Esther मिझोरमच्या लुंगलेई जिल्ह्यातील कॉलेज वेंगमध्ये राहते. तिच्या नावाचे एक YouTube चॅनेल आहे. तिचा ‘माँ तुझे सलाम’ हा लेटेस्ट व्हिडीओ 25 ऑक्टोबर 2020 रोजी पोस्ट करण्यात आला आहे. 2,50,000 पेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. Esther चे YouTube वर 62000 सबस्क्रायबर्स आहेत. तिच्या आईवडिलांनी गेल्या वर्षीच तिच्या गाण्याचे व्हिडिओ अपलोड करण्यास सुरवात केली होती. तिच्या अकाउंटवर लोकप्रिय मिझो, इंग्रजी आणि हिंदी गाण्यांचे तिचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे Esther ला फक्त तिची मातृभाषा मिझो येते तरी सुद्धा तिचे इतर भाषांतील व्हिडिओ कमाल आहेत.

(हे वाचा-शवपेट्यांना पॉलिश करायचं तर कधी दूधवाल्याचं काम करायचा पहिला जेम्स बाँड)

ईस्ट मोजोशी बोलताना, इस्टरच्या आईने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ती दोन वर्षांची असल्यापासून गाणं म्हणते. ती लहान असल्यामुळे तिचे उच्चार स्पष्ट येत नाहीत पण सर्व गाणी तिच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. लॉकडाउन दरम्यान, Esther च्या आईने तिच्याकडून दररोज सराव करून घेतला होता, त्यामुळे आता ती यामध्ये खूपच पारंगत झाली आहे.  तिच्या व्हिडीओचं रेकॉर्डिंग देखील घरीच करण्यात आलं आहे.  कालांतराने तिच्या आईवडिलांनी तिचे व्हिडीओ YouTube चॅनलवर शेअर करण्यास सुरु केली. तिच्या आईने प्रतिक्रिया देताना अभिमानाने असं म्हटलं की, तीची लाडकी लेक कोणत्याही भाषेतील गाणं म्हणू शकते.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
November 2, 2020, 8:24 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular