Home लेटेस्ट मराठी न्यूज VIDEO : फळ खरेदी करण्याच्या बहाण्यानं आला अन् खेचली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी...

VIDEO : फळ खरेदी करण्याच्या बहाण्यानं आला अन् खेचली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी Greater Noida Two men snatched the chain worn by a woman cctv video mhkk | Viral


महिलांनो सावधान! सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

ग्रेटर नोएडा, 05 नोव्हेंबर : अनलॉक होताच चोरांचा सुळसुळाट पुन्हा वाढायला लागला आहे. कधी दुचाकीवरून तर कधी भररस्त्यात अडवून सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार सुरूच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला रस्त्यावर सामनाची खरेदी करत असताना अचानक मागून येणाऱ्या दोघांनी तिच्या गळ्यातली सोनसाखळी खेचली आणि तिथून फरार झाले.

महिला सामना घेण्यात गुंग असल्यानं मागून येणारे दोन चोर तिला दिसले नाहीत. त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि ते फरार झाले. ही घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून महिलेनं स्थानिक पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता महिला खरेदी करत असताना चोर कशा प्रकारे चोरी करून पळ काढत आहेत.

हे वाचा-असले स्टंट तुम्ही करू नका ! चालत्या लोकलमध्ये मुलाने मारली उडी; VIDEO VIRAL

ही महिला फेरीवाल्याकडून फळ घेत असताना हा प्रकार ग्रेटर नोएडामध्ये घडला आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे पोलीस तपास करत आहे. आरोपींना तात्काळ बेड्या ठोकू असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं आहे. बेटा पोलीस स्थानकाच्या हट्टीत 2 नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. तर पोलिसांकडून या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे.


Published by:
Kranti Kanetkar


First published:
November 5, 2020, 11:34 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular