Home लेटेस्ट मराठी न्यूज US Election : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत काँटे की टक्कर, ट्रम्प यांनी घेतली आघाडी...

US Election : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत काँटे की टक्कर, ट्रम्प यांनी घेतली आघाडी us-presidential-elections-america-us-presidential-election-2020-voting-result-live-updates-joe-biden vs-donald-trump lead-mhss | Videsh


जो बायडन (joe biden) यांनी बहुमताकडे आघाडी घेतली होती पण आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी डाव उलटून टाकला आहे.

अमेरिका, 04 नोव्हेंबर : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची (US President Election 2020) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, जो बायडन (joe biden) यांनी बहुमताकडे आघाडी घेतली होती पण आता  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी डाव उलटून टाकला आहे. ट्रम्प यांनी बायडन यांना मागे टाकत मतमोजणीत आघाडी घेतली आहे.

मतमोजणीच्या सुरुवात झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे पिछाडीवर होते. त्यामुळे बायडन यांनी जोरदार आघाडी घेतली होती. पण, दुपारनंतर अचानक मतमोजणीचे चित्र पलटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 213 जागांवर आघाडी घेतली आहे. तर जो बायडन  220 जागांवर लढत देत आहे. ट्रम्प यांनी 3 जागांनी बायडन यांना मागे टाकले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये  ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. टेक्सासमधील विजयामुळे मतमोजणीतील चित्र पूर्णपणे पालटले आहे.

आतापर्यंत अमेरिकेत 50 पैकी 41 राज्यांचा निकाल हाती आला आहे.  फक्त 9 राज्यांचा निकाल बाकी आहे. पेंसिल्वेनिया आणि जॉर्जियामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहे. तर टेक्सास, साउथ कॅरोलिना आणि ओक्लाहोमामध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. पण, दुसरीकडे जो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

यूएस नेटवर्क्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायोमध्ये विजय मिळवला आहे. पण, निकाल जसे जसे हाती येत आहे, तशी अमेरिकेत परिस्थिती आणखी चिंताजनक बनत चालली आहे. ट्रम्प यांच्या निवास्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अलबामा, मिसिसिप्पी, ऑक्लाहोमा आणि टेनेसी या भागांमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेर, इलिनॉय, मेरीलँड, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी रोड आयलँड या भागांमध्ये विजय मिळवला आहे.

प्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन यांच्यात काँटे की टक्कर आहे. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या वृत्तानुसार इंडियाना इथे ट्रम्प यांना 65.7 टक्के मत मिळाली आहेत तर बायडन यांना 32.6 टक्के मतं मिळवली आहेत. हॅम्पशायर इथे डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी आहे. रिपब्लिकन पक्षचा ऐतिहासिक विजय होईल आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी शपत घेईन असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी रॅलीदरम्यान व्यक्त केला होता. ट्रम्प आणि बायडन यांच्यात सध्या चुरशीची लढत होत असून अंतिम निकाल हाती येणं अद्याप बाकी आहे. संपूर्ण जगाचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे.


Published by:
sachin Salve


First published:
November 4, 2020, 11:30 AM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular