Home लेटेस्ट मराठी न्यूज US Election मोठी अपडेट : थोड्या फरकाने बायडेन जिंकल्याने या राज्यात पुन्हा...

US Election मोठी अपडेट : थोड्या फरकाने बायडेन जिंकल्याने या राज्यात पुन्हा होणार मतमोजणी | News


डोनाल्ड ट्रम्प सहजासहजी राष्ट्राध्यक्षपद सोडणार नसल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे या राज्यात पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे

वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : अमेरिकेत अद्यापही राष्ट्राध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू आहे. यशाच्या पायऱ्यांवर चढणारे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बाइडन यांना जॉर्जिया राज्यात लीड मिळाल्याची माहिती समोर आली असताना मोठा धक्का बसला आहे. बायडन साधारण 1500 मतांनी पुढे असल्याचे समोर आले होते. त्यातच या राज्यात पुन्हा मतमोजणी केली जाणार असल्याचे राज्याच्या सचिवांनी सांगितले आहे. जॉर्जिया राज्याच्या सचिवांनी  सांगितले की निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे.

जॉर्जिया राज्यात 16 इलेक्ट्रोरल वोट आहेत. व्हाइट हाउसपर्यंत पोहोचण्यासाठी 538 ‘इलेक्ट्रोरल कॉलेज वोट’ पैकी 270 वोट मिळणं आवश्यक आहे. आतापर्यंत बायडन यांना 264 आणि ट्रम्प यांना 213 इलेक्ट्रोरल मतं मिळाली आहेत. जर बायडन यांना जॉर्जियामध्ये विजय मिळाला तर नेवाडा वा एरिज़ोना (दोन्ही राज्यात बायडन लीडवर ) वा पेन्सिल्वेनिया येथील विजय मिळाल्यानंतर बाइडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील.

अमेरिकन निवडणुकीचे महत्त्व

अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीकडे जगभरातील सर्वांचे लक्ष लागून असते. परंतु यावेळी सर्व लहान मोठ्या देशांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. सत्तेत कोण येणार याचा  परराष्ट्र धोरणांवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. चीन सध्या अनेक देशांवर दबाव आणत असून ट्रम्प आणि बायडन यांच्या निवडीमुळे या धोरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.

ट्रम्प यांना आहे विश्वास

मेल-इन- बॅलेटमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी या मतमोजणीला विरोध केला आहे. ही सगळी मते डेमोक्रॅट्स पक्षाला मिळाली असल्याने ट्रम्प यांच्या या दाव्याला बळ मिळत आहे. यामुळे ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात देखील जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या तपासानंतर ते विजयी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.


Published by:
Meenal Gangurde


First published:
November 6, 2020, 9:38 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular