Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra tomato bases virus: चिकननंतर आता टोमॅटोवरील रोगाची चर्चा - hoax about tomato...

tomato bases virus: चिकननंतर आता टोमॅटोवरील रोगाची चर्चा – hoax about tomato based virus in ahmednagar


अहमदनगर: कोंबड्यावरील रोगाचा मानवांना संसर्ग होत असल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा पसरविण्यात आली. तशीच चर्चा आता टोमॅटोवरील रोगासंबंधी सुरू आहे. मात्र याला कोणताही आधार नसून यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेतकरी नेते करीत आहेत.

भारतीय किसान सभेतर्फे डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, टॉमेटोच्या पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आवाहन किसान सभा करत आहे.

करोना Live: रुग्णवाढीचा वेग कायम; राज्यात आकडा २९ हजार पार

वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे.

अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडीओ एडिट करून वापरले जात आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.

‘ही’ मोदी सरकारच्या पॉलिसीतील गडबड नाही का?: अमोल कोल्हे

टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बेंगलोर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसात याबाबत निदान होईल अशी अपेक्षा आहे. कृषी विभागाने या निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून आजारावरील उपचाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तातडीने उपलब्ध करून दयावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

खडसे, मुंडे, तावडे अस्वस्थ आहेत; भाजपनं सावध राहावं: शिवसेनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular