Home मनोरंजन Tom & Jerryच्या जोडीचा चित्रपटातून होणार कमबॅक; ट्रेलरवर लाइक्सचा पाऊस tom-and-jerry-movie-trailter-release-cinema-in-2021-mhaa |...

Tom & Jerryच्या जोडीचा चित्रपटातून होणार कमबॅक; ट्रेलरवर लाइक्सचा पाऊस tom-and-jerry-movie-trailter-release-cinema-in-2021-mhaa | News


Tom & Jerryच्या जोडीचा चित्रपटातून होणार कमबॅक; ट्रेलरवर लाइक्सचा पाऊस

टॉम अँड जेरीची (Tom & Jerry) जोडी आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. टॉम अँड जेरीच्या करामती लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

मुंबई, 18 नोव्हेंबर: तुम्हाला कोणतं कार्टून आवडतं असा प्रश्न विचारला तर आजकालच्या तरुणाईच्या ओठावर सहजच टॉम अँड (Tom & Jerry) जेरी हे नाव येईल. तीच मजा आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. टॉम अँड जेरी यांच्यावर आधारित अ‍ॅनिमेटेड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

एकमेकांच्या खोड्या काढत आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवणारं हे कार्टून आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटामध्ये   ग्रेस मोरेट्ज, मायकेल पेन्या, रॉब डलेनी, कॉलिन जोस्ट आणि केन जेंग हे कलाकारही झळकरणार आहेत. यूट्यूबवर या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अमेरिकेच्या एका शहरात भारतीय पद्धतीच्या लग्न सोहळ्याचं आयोजन केलेलं असते. तिथे टॉम अँड जेरी पोहोचतात. आणि पुढे जो धुमाकूळ घालतात. ते सिनेमामध्येच पाहता येईल. हा सिनेमा पुढच्या वर्षी अर्थात 2021 रोजी रिलीज होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टॉम अँड जेरीच्या ट्रेलरला जगभरातील चाहत्यांचा प्रतिसाद लाभला. या ट्रेलरला आत्तापर्यंत  2 लाख 40 हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

टॉम (मांजर) आणि जेरी (उंदराचा) पकडापकडीचा खेळ, टॉमला जेरीस आणण्यासाठी जेरीने वापरलेल्या भन्नाट युक्त्या या सगळ्याची मजा आपल्याला पुन्हा एकदा घेता येणार आहे. या कार्टूनमुळे तुमच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 18, 2020, 7:38 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular