Home संपादकीय THE LEGEND मानवतेचे सेवक लुईस पाश्चर / Story Of Louis Pasteur

मानवतेचे सेवक लुईस पाश्चर / Story Of Louis Pasteur

मित्रांनो तुमच्या मित्राला किंवा इतर कोणाला कधीतरी कुत्रा चावलेला असेलच .कुत्रा चावल्यानंतर आपण आधी डोक्यात कोणता विचार आणतो , या कुत्र्याला रेबीज तर नसेल ना .आजच्या जगात सुद्धा रेबीजला एवढे घाबरणारे लोक आहेत.

Dog bite

1800 च्या दरम्यान जेव्हा या रेबीज वर कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नव्हती तेव्हा कित्येक लोक रेबीज सारख्या रोगामुळे मृत्यू पावत होते . अशा भयंकर रेबीज सारख्या रोगावर ज्या महान पुरुषाने लस काढली त्यांचे नाव आहे लुई पाश्चर .

लुई पाश्चर यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 ला झाला त्यांचे लहानपण फार गरीबीत गेले. लुई पाश्चर यांचे वडील पेशाने मास विक्रेता होते .त्यांना नेहमी असे वाटायचे की मी हे काम करण्या पेक्षा जर अभ्यास केला असता तर कोणत्या तरी सरकारी कार्यालयांमध्ये आरामात काम करीत असतो.

संग्रहित छायाचित्र

म्हणून लुई पाश्चर यांच्या वडिलांची नेहमी पासून अशी इच्छा होती की त्यांनी तरी हे काम केले पण त्यांच्या मुलांनी शिकून-सवरून मोठे व्हावे आणि इतरांचे भले करावे व स्वतः त्यांचे आयुष्य आरामात जगावे.

त्यामुळे त्या गरिबीमध्ये सुद्धा त्यांच्या वडिलांनी लुई पाश्चर यांना त्याकाळच्या महागड्या शाळेमध्ये शिकवले. लहानपणी लुई पाश्चर यांना अभ्यासामध्ये तेवढा रस नव्हता आणि ते अभ्यासासाठी तेवढे जिद्दी सुद्धा नव्हते.

पण समोर अशी काही घटना घडली त्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व हे कळले .शिक्षणाने ते स्वतःच्या आयुष्याचा उपयोग इतरांचे आयुष्य उज्वल करण्यासाठी आणि निरोगी करण्यासाठी वापरू शकतात असे त्यांना वाटले.

त्या काळात एकदा असे झाले की गावामध्ये एक जंगली कोल्हा इतर लोकांना चावून पळत होता आणि त्या जंगली कोल्ह्याच्या चाव्यामुळे जखमी झालेली लोक हळूहळू मृत्यू पावत होती. हे सगळे बघून लुई पाश्चर यांना असे वाटले की ह्या लोकांच्या रोगावर जर कोणते उपाय योजना नाही तर असे करून सगळे लोक हळूहळू मरत जातील .

त्या काळामध्ये पूर्ण विश्वाची लोकसंख्या दीडशे कोटी एवढी होती .आणि त्यापैकी एक कोटी लोक दरवर्षाला रेबीज या रोगामुळे मारायची . ज्या व्यक्तींना रेबीज हा रोग व्हायचा ते व्यक्ती पाण्यापासून घाबरायचे आणि त्या प्राण्यासारखे वागायला लागायचे. डोक्यात वेड येईल की काय असे इतर लोकांना वाटायचे.

त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा सुद्धा पसरत होती .त्या लोकांसाठी कोणती उपाययोजना करता येईल असा प्रश्न ते आपल्या वडिलांना नेहमी विचारायचे. एक वेळी त्यांचे वडील त्यांच्या प्रश्नाला कंटाळून त्यांना असे उपदेश केले की तुला एवढेच त्यांची काळजी वाटते तर तूच स्वतः शिकून याचा शोध का नाही घेत .

तेव्हापासून लुई पाश्चर यांना अभ्यासाची गोडी लागली आणि आपण स्वतः समोर जाऊन या रोगावर कोणतीतरी उपाययोजना करावी असे त्यांचे स्वप्न बनले . त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हे 1842 मध्ये ते स्वतः स्टार्स बर्ग विश्व विद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवू लागले .

तिथे शिकवत असताना त्यांनी स्वतः काही गोष्टींवर आणि रोगांवर प्रयोग करणे सुरू केले. त्यांना त्यांच्या प्रयोगा दरम्यान असे आढळले की दूध अन्न यासारख्या काही गोष्टींमध्ये जिवाणू असतात. जे जिवाणू स्वतः त्या अन्नाला खराब करतात .

दुधाला 60 ते 75 डिग्री च्या दरम्यान उकळविल्यास आणि त्यानंतर थंड केल्यास दूध काही दिवसापर्यंत खराब होत नाही असे त्यांना आढळले. याच सगळ्या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असे म्हणतात .जिवाणूंचा शोध सुद्धा लुई पाश्चर यांनी लावला आहे .

प्रयोगाचा दरम्यान त्यांना असे आढळले की हे जिवाणू हे डोळ्यांनी दिसत नाही, पण मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यास ते काही प्रमाणात दिसतात. तेव्हा त्यांना असे वाटले की याच प्रकारचे जिवाणू आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतील .

त्यांना कधीतरी असे सुद्धा वाटायचे की आपल्या शरीरामध्ये अशी कोणती तरी शक्ती आहे जी आपल्याला रोग झाल्यावर तो रोग बरा करण्यास आपल्याला मदत करते . त्याच दरम्यान त्यांना त्यांचे लहानपणीचे स्वप्न आठवले.

या सगळ्या शोधाच्या नंतर त्यांनी रेबीज वर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी एका प्रकारचे द्रव्य तयार केले ज्या द्रव्यांमध्ये ते रेबीज चे जिवाणू मिळवीत होते. रेबिसे जीवाणू मिळविण्या करता ते रेबीज झालेल्या कुत्रे , माकड , कोल्हे अशासारखे इतर प्राण्यांचा मागे जात होते .

रेबीजच्या जिवाणूसाठी त्यांनी स्वतःला काही प्राण्यांपासून जखमी सुद्धा करून घेतले. कुत्र्याची लाळ असो किंवा इतर कोणताही प्राण्यांचा अंगाचा भाग त्याच्या रक्तापासून अथवा लाळीपासून मिळालेले रेबीज जिवाणू ते जमा करून त्यांच्यावर प्रयोग करीत होते .

काही प्रयोगानंतर त्यांना असे कळले की रेबीज वर औषध बनणे फार कठीण आहे आणि रेबिज जिवाणू माणसाच्या किंवा कोणत्याही जनावराच्या अंगात शिरल्यानंतर त्या जनावराच्या रोगप्रतिकारशक्‍ती ला माहिती न पडू देता आपले काम करीत असतात.

त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती त्यांना मारू शकत नाही असे त्यांना वाटायचे. जे खूप प्रमाणामध्ये बरोबर सुद्धा आहे . त्यांनी एक असे प्रकारचे द्रव्य तयार केले की ज्यामुळे रेबीजचे जिवाणू जेव्हा कोणत्याही प्राण्याच्या किंवा मनुष्याच्या शरीरामध्ये शिरायचे तेव्हा त्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला माहिती पडून जायचे की हि रेबीज जिवाणू आहेत.

त्यामुळे रेबीज ला हरविण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ति मारक ठरायची .याच्या प्रयोगासाठी त्यांनी एका रेबीज न झालेल्या कुत्र्याला हे इंजेक्शन टोचले आणि त्या प्राण्यांमध्ये रेबिजचे जीवाणू सोडले. त्या प्राण्यावर ठेवलेल्या काही दिवसाच्या निरीक्षणानंतर त्यांना असे आढळले की , त्यांनी तयार केलेले लस हे उपयोगी आहे .

पण ते माणसावर प्रयोग करण्यासाठी आताही तेवढे सशक्त झाले नव्हते. त्याच दरम्यान त्यांच्याजवळ एक अशी स्त्री आली की तिच्या मुलाला एका रेबीज झालेला कुत्र्याने चावा घेतला होता. त्याच्या उपचाराकरिता ती स्त्री त्यांच्याकडे विनवणी करत होती .

पण या लसीचा उपयोग त्यांनी प्राण्यांवर केला आहे तो मनुष्य वर किती कार्गर आहे याच्याबद्दल त्यांना शंका होती . त्यामुळे त्या स्त्रीला रोगावर उपचार करण्यासाठी नाही म्हटले .परंतु त्या स्त्रीच्या विनवणी केल्यानंतर ते त्या गोष्टीसाठी तयार झाले .

त्यांनी लहान मुलाला सतत 21 दिवसापर्यंत तयार केलेले लसीचे फार कमी प्रमाणामध्ये डोस दिले आणि 21 दिवसानंतर त्या मुलाचे प्रकृती सुधारू लागली .

दिवस-रात्र प्रयोगशाळेमध्ये मेहनत करून तयार केलेल्या लसीमुळे इतरांचे जीव वाचत आहे याचा आनंद त्यांना फार झाला होता ,पण या दरम्यान त्यांनी स्वतःच्या परिवाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होतं .त्यांना तीन मुली होत्या आणि पत्नी होती .

त्या तीन मुली पैकी दोन मुली ब्रेन ट्यूमर मुळे मरण पावल्या होत्या आणि एका मुलीला लखवा झाला होता . तीन मुलींच्या मृत्यूमुळे त्यांची आई म्हणजेच लुई पाश्चर यांची पत्नी मानसिक रोगी झाली होती .

ज्या काळात लुई पाश्चर यांच्या पत्नीला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी स्वतःच्या पत्नीला न स्वीकारता समाजामध्ये पसरलेला या रोगावर उपचार शोधण्यासाठी स्वतःचा वेळ घालवला आणि त्याचेच पडसाद म्हणून त्यांची पत्नी मानसिक रोग झाली .

काही दिवसांनी ती सुद्धा मरण पावली. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी स्वतःचे पूर्ण आयुष्य झोकून दिले .अशा लुई पाश्चर यांना मानाचा मुजरा , लुई पाश्चर यांनी रेबीज वर लसीचा शोध 1885 मध्ये लावला होता .

रेबीज वर उपचारा प्रमाणेच त्यांनी इतर सुद्धा काही शोध लावले आहेत . त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकलकोंड्या पणमुळे लुई पाश्चर यांचा 1895 मध्ये मृत्यू झाला.

मित्रांनो तुम्हाला लुई पाश्चर यांची जीवन कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular