Home लेटेस्ट मराठी न्यूज मुंबईतील एमएमआरडीए मैदानात शरद पवारांचा दौरा - Sharad Pawar's visit to MMRDA...

मुंबईतील एमएमआरडीए मैदानात शरद पवारांचा दौरा – Sharad Pawar’s visit to MMRDA ground in Mumbai – Latest News

मुंबई- कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सगळे राजकीय नेते आपआपल्या परीने मदत करीत आहेत अश्यातच मुंबईतील एमएमआरडीए मैदानात (क्वारंटाईन) विलगीकरणाची सोया तयार करण्यात येत असल्याने शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एमएमआरडीए मैदानात भेट देत पाहणी केली आहे .

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढती संख्या बघता तसेच मुंबई हॉटस्पॉट झोनची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन कालावधीत तब्बल ५० दिवस घरी असणारे शरद पवार आज कोरोना विरुद्ध मैदानात आल्यानं एक राजनॆतिक तुफान दिसतंय .हि कोरोना रुग्णांसाठी त्यांची असल्याचं सुद्धा दिसत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी क्वारंटाईन सुविधांची पाहणी केली.

लॉकडाऊनममुळे सध्याची परिस्थिती, तसेच लॉकडाऊनच्या पुढील टप्प्यातील नियोजन काय राहील आणि राज्यातील काही मुख्य तसेच व्यवहारिक दृष्ट्या सक्षम ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करता येईल का या संपूर्ण बाबतीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला आहे .

यासाठी देखील आजच्या बैठकीत शरद पवार यांनी खास हजेरी लावली असल्याचे दिसते . या बैठकीला, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगांचे जेवढे नुकसान होत आहे ते बघता साखर उद्योगासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे . आपण अर्थात शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती दिली त्यांनी दिली आहे .

केंद्र सरकारने जे पॅकेज तयार केले आहे त्या पॅकेजची राज्यात अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करायची आणि लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील कोरोना महामारीचे संकट कसे थांबवता येईल व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे याकरीत तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून तर आज पर्यंत लॉकडाऊनचे नियमित पालन करताना दिसून आले तेच . मात्र, फेसबुक लाईव्ह आणि फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून ते जनतेशी आणि सरकारमधील मंत्र्यांशी नियमितरित्या आवर्जून आणि संपूर्ण जबाबदारीने चर्चा करतच होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कधी फोनद्वारे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं सोबत शरद पवारानी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारेही चर्चा केली होती .राज्यातील आणि देशातील मराठी लोकांसाठी फेसबुक लाईव्हद्वारेही ते जनतेशी संवाद साधताना तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसून आले आहे .

दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबत आज ठरलेल्या बैठकीत हजेरी लावल्यानंतर त्यांनी विलगीकरण ठिकाणावर जाऊन पहाणी केली आहे . राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पाहणी करत असताना तिथल्या विलगीकरण (क्वारंटाईन) सुविधेचा व तेथील परिस्थितीचा आढावाही शरद पवार यांनी घेतला आहे .

गेल्या ५० दिवसांपासून घरी बसून मार्गदर्शन करणारे पवार आज खुद्द मैदानात पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं असेलच . तुम्हाला हे बघून काय वाटत ते नक्की सांगा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular