Home Uncategorised Sachin Kumar Death: 'कहानी घर घर की' फेम अभिनेता सचिन कुमारचं निधन...

Sachin Kumar Death: ‘कहानी घर घर की’ फेम अभिनेता सचिन कुमारचं निधन – kahaani ghar ghar kii actor sachin kumar died of a heart attack on friday


मुंबई: ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनातून बॉलिवूड सावरत असतानाच हिंदी मालिका विश्वातील अभिनेता आणि अक्षय कुमारचा आते भाऊ सचिन कुमार याचं निधन झालं. सचिनचं अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सचिननं अंधेरीतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

कहानी घर घर की’ या गाजलेल्या मालिकेत सचिननं महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून काही वर्ष काम केल्यानंतर सचिननं फोटोग्राफर म्हणून काम सुरू केलं होतं. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचं त्यानं फोटोशूट केलं होतं.

सचिनं त्याच्या पालकांसोबत अंधेरीतील घरात राहत होता.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सचिन हा गुरुवारी रात्री झोपायला गेला पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं दारचं उघडलं नाही. त्यानं दार न उघडल्यानं पालक घाबरून गेले होते. सचिन दरवाजा उघडत नसल्यानं त्यांनी दुसऱ्या चावीनं दरवाजा उघडला आणि आत गेल्यावर तिथं सचिन मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं.

‘कहानी घर घर की’ मालिकेनंतर सचिननं ‘लज्जा’ या मालिकेत देखील काम केलं होतं. सचिनच्या अकस्मात निधनावर टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक एवी अरुणचं निधन

‘सचिन नेहमीच सकारात्मक असायचा. दुस-यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायचा’, असं म्हणत ‘लज्जा’ मालिकेचे निर्माते बेनाफर कोहली यांनी सचिन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आमिर खानच्या असिस्टन्टचा हार्टअटॅकने मृत्यू, दोन दशकांची होती साथSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular