Home Uncategorised realme narzo 10: रियलमीच्या Narzo 10 स्मार्टफोनचा आज पहिला सेल - realme...

realme narzo 10: रियलमीच्या Narzo 10 स्मार्टफोनचा आज पहिला सेल – realme narzo 10 first sale on flipkart today know price specifications and offers


नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने गेल्या आठवड्यात नार्जो सीरिज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले होते. आज यापैकी Narzo 10 या स्मार्टफोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. कंपनीची अधिकृत साइट आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून ग्राहकांना हा फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना काही खास ऑफर्स सुद्धा मिळणार आहेत.

वाचाः Reliance Jio: वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट प्लान्स, ७३० GB पर्यंत डेटा, अन्य फायदे


Narzo 10 ची किंमत

४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रीन आणि व्हाईट या दोन रंगात खरेदी करता येवू शकतो.

Narzo 10 खरेदीवर ऑफर्स

हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोबीक्विककडून ५०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ग्राहकांना एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. नो कॉस्ट ईएमआय ऑफर मिळणार आहे. तसेच टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून युजर्संना या स्मार्टफोन खरेदीवर डबल डेटा बेनिफिट मिळणार आहे. परंतु, यासाठी युजर्संना ३४९ रुपयांचा प्लान रिचार्ज करावा लागेल.

वाचाःBSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज, अनलिमिटेड व्हॉईस मेसेज पाठवा


Narzo 10 चे खास वैशिष्ट्ये

रियलमीने Narzo 10 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. स्क्रीनसाठी २.५डी कॉर्निंग गोरीला ग्लास दिला आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ८० चिपसेट सोबत ४ जीबी रॅमचा सपोर्ट दिला आहे. युजर्संना या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप (चार कॅमेरे) दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सलचा लेन्स, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ज्याला एचडी व्हिडिओ क्वॉलिटी सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये १८ वॅट क्विक चार्जिंग फीचरसोबत ५००० एमएमएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ब्लूटूथ ५, जीपीएस, ड्यूअल सीम ४जी, व्हीओएलटीई, यूएसबी टाइप सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर देण्यात येणार आहेत.

वाचाःशाओमी व आयफोनला मागे टाकले, सॅमसंगच्या ‘या’ फोनची जगात सर्वाधिक विक्री

वाचाः Samsung Galaxy A11, Galaxy A31 लाँच, पाहा किंमत-वैशिष्ट्ये

वाचाः करोना संसर्गः मोबाइलसह ‘या’ ७ वस्तूला सर्वात जास्त स्पर्श

वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A21s क्वॉड कॅमेऱ्यासह लाँच, पाहा किंमत-फीचर्सSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular