Home लेटेस्ट मराठी न्यूज PMGKY: सामान्यांना मोफत मिळू शकतं धान्य आणि रोखरक्कम! तिसऱ्या आर्थिक पॅकेजच्या तयारीत...

PMGKY: सामान्यांना मोफत मिळू शकतं धान्य आणि रोखरक्कम! तिसऱ्या आर्थिक पॅकेजच्या तयारीत सरकार report says that under pmgky scheme government may extend social benefits know the details mhjb | News


कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी सरकारकडून तिसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते. या पॅकेजमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) येणारे फायदे पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत वाढवले जाऊ शकतात.

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी सरकारकडून तिसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते. एका मीडिया अहवालानुसार, या पॅकेजमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) येणारे फायदे पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत वाढवले जाऊ शकतात. सामान्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारकडून ही योजना वाढवण्याचा विचार सुरू आहे. जुनपर्यंत असणारी ही योजना सरकारने नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

गरीबांसाठी सरकारने कोरोना व्हायरस पँडेमिक दरम्यान होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून वाचण्यासाठी PMGKY ची घोषणा केली होती. सुरुवातीला ही योजना जूनपर्यंत लागू करण्यात आली होती, मात्र देशातील परिस्थिती पाहता सरकारने या योजनेचे फायदे नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे. पण आता पुन्हा एकदा अशी माहिती समोर येते आहे की, सरकार या योजनेचे फायदे मार्च 2021 पर्यंत वाढवू शकते.

पॅकेज 3.0 मध्ये काय असणार योजना?

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या योजनेमध्ये सरकार रोख रकमेबरोबरच धान्य देण्याचा कालावधी वाढवेल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रोत्साहन पॅकेज 3.0 मध्ये मागणी वाढवणाऱ्या आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या उपायांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आहे.

PMGKY मध्ये रोख रकमेचे ट्रान्सफर ही योजना समाविष्ट होऊ शकते

मीडिया अहवालानुसार, या तिसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये 20 कोटी जनधन खाती आणि 3 कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांसाठी कॅश ट्रान्सफर केली जाण्याची योजना समाविष्ट होऊ शकते.  रोख रकमेचे हे हस्तांतरण PMGKY चा महत्त्वाचा हिस्सा असेल.

PMGKY चे लाभ

-PMGKY अंतर्गत सरकारने एका व्यक्तीला एका महिन्यासाठी 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जातात. देशातील जवळपास 81 कोटी जनतेला फायदा होत आहे

-त्याशिवाय  19.4 कोटी हाऊसहोल्ड्सना दर महिन्याला एक किलो चणा मोफत दिला जातो.

-हे धान्य नॅशनल फूड सिक्योरिटी अॅक्ट अंतर्गत दिले जात आहे.

काय आहे PMGKY?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात लोकांवरील आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची घोषणा केली होती. एकूण 1,70 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची ही घोषणा करण्यात आली होती, ज्याअंतर्गत गरिबांना मोफत धान्य, महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा या योजनेअंतर्गत केली होती. यामध्ये पीएम शेतकरी सन्मान निधीअंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे डिरेक्ट ट्रान्सफर करण्यात आले आहेत

PMGKY चा कालावधी का वाढण्याची शक्यता?

या पँडेमिक दरम्यान सरकारने जनतेला असे आश्वासन दिले आहे की, धान्याच्या कमतरतेमुळे पुढील पाच महिन्यात कोणताही परिवार उपाशी राहणार नाही. असे म्हटले जात आहे की, याच आश्वासनाच्या आधारावर ही योजना आणखी पुढे वाढवली जाऊ शकते

बिहार निवडणुकीआधी पॅकेज येण्याची शक्यता

या अहवालानुसार सरकार लवकरच या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण या पॅकेजचे राजकीय परिणामही दिसतील. बिहार निवडणुकीआधी या पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
October 27, 2020, 11:47 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular