Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra nilesh rane vs rohit pawar: ट्विटरवॉर: रोहित पवारांवर नीलेश राणेंचा पलटवार; वापरले...

nilesh rane vs rohit pawar: ट्विटरवॉर: रोहित पवारांवर नीलेश राणेंचा पलटवार; वापरले बोचरे शब्द – twitter war erupts between nilesh rane and rohit pawar


मुंबई: साखर उद्योगावरील आर्थिक संकटाला वाचा फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका पत्रावरून राज्याच्या राजकारणातील दोन तरुण नेते आमदार रोहित पवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला असून हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

काळजी नसावी! रोहित पवारांनी नीलेश राणेंना सुनावलं

लॉकडाऊनमुळे साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटात आहे व या उद्योगाला सावरण्यासाठी भरीव आर्थिक मदत करावी, अशी विनंती करणारं एक पत्र शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने शुक्रवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा संदर्भ देत नीलेश यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी साखर उद्योगाला आजवर देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘साखरेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आतापर्यंत किती पैसे खर्च झाले ह्याचे ऑडिट व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली होती. ‘साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षानुवर्षे साथ देत आले आहेत. तरीही साखर उद्योगाला वाचवण्याची मागणी केली जाते,’ याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. नीलेश यांच्या या ट्विटनेच वादाची पहिली ठिणगी पडली. नीलेश यांच्या टीकेला रोहित पवार यांनी आज ट्विटरच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं.

पवार, ठाकरेंची शिष्टाई यशस्वी… ‘या’ राज्यांसाठी प्रथमच सुटली ट्रेन

‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असतात. पंतप्रधान मोदीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी’, अशा शब्दांत रोहित यांनी नीलेश यांना उत्तर दिलं होतं. रोहित यांच्या या ट्विटनंतर हा वाद तिथेच न थांबता आणखी भडकला आहे.

नीलेश राणे यांनी रोहित यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना अत्यंत टोकदार भाषेचा वापर केला आहे. रोहित यांच्या ट्विटनंतर काही तासांतच रोहित यांचं ट्विट एम्बेड करून नीलेश यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. ‘मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी’, असा पलटवार नीलेश यांनी केला आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये नीलेश यांनी रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. ‘शेंबडे’ या शब्दाचा वापर करत साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?, असा सवाल त्यांनी केला आहे. नीलेश यांच्या या ट्विटनंतर रोहित विरुद्ध नीलेश हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.

‘ही’ केंद्र सरकारच्या पॉलिसीमधील गडबड नाही का?: अमोल कोल्हेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular