Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra mumbai news News : धारावीत करोनाचा कहर; दररोज ५० रुग्णांची भर -...

mumbai news News : धारावीत करोनाचा कहर; दररोज ५० रुग्णांची भर – dharavi reports new coronavirus positive cases


‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

धारावीत करोनाचा अक्षरश: कहर सुरू असून, दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांत ४४ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२००च्या वर पोहोचली असून, आतापर्यंत सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत करोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असतानाही रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. रविवारी आढळून आलेले नवे रुग्ण मुस्लिमनगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरानगर, लक्ष्मी चाळ, महात्मा गांधीनगर, न्यू पारसी चाळ, जनता सोसायटी, कल्याणवाडी, शाहुनगर, जास्मिन मिल रोड, गुलमोहर चाळ, ढोरवाडा, सर्वोदय सोसायटी, सोशलनगर, मुकुंदनगर, काळा किल्ला, कुंचीकोरवेनगर, ६० फुटी रस्ता, या परिसरात आढळले असल्याची माहिती पालिकेच्या जी-उतर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

दादर, माहीममध्ये ११ नवीन रुग्ण

दादर व माहीम परिसर मिळून रविवारी दिवसभरात ११ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दादरमधील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५९ झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये करोनाचे १४ नवे रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा १९३वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावी :

– रोज सापडतात ५० ते १०० रुग्ण

– आतापर्यंत रुग्णसंख्या १२०० वर

– आतापर्यंतचे एकूण मृत्यू ६०

दादर :

रुग्णसंख्या १५९

मृत्यू : ७

माहीम :

रुग्णसंख्या १९३

मृत्यू : ८Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular