Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra mumbai covid 19 patient: दिलासा! मुंबईतील रूग्णांच्या दुपटीचा कालावधी १५ दिवसांवर -...

mumbai covid 19 patient: दिलासा! मुंबईतील रूग्णांच्या दुपटीचा कालावधी १५ दिवसांवर – mumbai current doubling rate of covid 19 cases improved to 15 days says bmc


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नीती आयोगाने मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर आला असल्याची माहिती रविवारी दिली, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पालिका आयुक्त चहल यांनी रविवारी शीव रुग्णालयातील करोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षात जाऊन रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. करोनावर मात करण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांनी सिंहाचा वाटा उचलला असून, शीव रुग्णालयातील रुग्ण तसेच रुग्णालयाची स्थिती कशी आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाबाधित रुग्ण तसेच व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या काय सूचना आहेत, आरोग्य सुविधांमध्ये काय सुधारणा करणे शक्य आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेता आले असल्याचे चहल यांनी सांगितले. रुग्णालयातील शवागारात जाऊन निर्धारित केलेल्या प्रणालीप्रमाणे काम होत आहे की नाही, याची पाहणी आयुक्तांनी केली. यापूर्वी मुंबईकरांनी लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढे केल्यास करोनावर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुसऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या संख्येने मुंबईत येत असून डॉक्टरांची कोणतीही कमतरता नसल्याचे ते म्हणाले.

चिंताजनक! राज्यात आज २३४७ नवे करोनाग्रस्त; ६३ रुग्णांचा मृत्यू

पालिका रूग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. भारमल यांनी एका सादरीकरणाद्वारे शीव रुग्णालयात एकूण १४५० खाटा उपलब्ध असून, यापैकी ३८० खाटा या करोनाबाधितांसाठी असल्याचे सांगितले. दोन महिन्यांत १५० महिलांची प्रसुती झाल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत रूग्णालयात २८३ करोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती त्यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमधील दीड महिन्यांच्या बाळाची करोनावर मात

आयसीयूवर नियंत्रण करणे शक्य आहे का?

अतिदक्षता विभागामध्ये कॅमेरे लावून कंट्रोल रूममधून नियंत्रण करणे शक्य आहे का? याची पाहणी केल्याचे आयुक्तांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी आपले अतिदक्षता कक्ष पालिकेला वापरण्यास मुभा दिली असून यामुळे येथील खाटा मोठ्या संख्येने वापरण्यास मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन; केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

रूग्ण ७ दिवसांत घरी

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पालिकेचे काम सुरू असून त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सात दिवसानंतर रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे अधिक खाटा उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान येत्या मंगळवारपासून रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular

LIVE : मुंबईत सिलेंडरचा स्फोट; 5 जखमी तर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू...

- मुंबईतील अंधेरी साकीनाका परिसरात एलपीजी सिलेंडरचा स्फोट - स्फोटात 5 जखमी तर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू - जखमींवर राजावाडी रुग्णलायत उपचार सुरू -  आनंद भुवन...