Home Uncategorised Mohammed Shami: मोहम्मद शमीला मोठा धक्का; पत्नीमुळे झाले मोठे नुकसान - Mohammed...

Mohammed Shami: मोहम्मद शमीला मोठा धक्का; पत्नीमुळे झाले मोठे नुकसान – Mohammed shami don’t get nomination for Arjuna award because of his wife hasin jahan


भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा एक गुणवान खेळाडू आहे. फक्त संघातील खेळाडूच नाही तर जगभरातील क्रिकेटपटू त्याची स्तुती करतात. त्यामुळे शमीला काही गोष्टी मिळायला हव्यात, त्यासाठी तो लायक आहे, असे बऱ्याच चाहत्यांचे मत आहे. पण शमीला सध्याच्या घडीला काही गोष्टी मिळत नाहीत. त्यामध्ये शमीला एक मोठा धक्का बसला आहे. पत्नी हसीन जहामुळे शमीला मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. आता शमीला पत्नीमुळे कोणते मोठे नुकसान झाले आहे, ते जाणून घेऊया…

शमीला पुरस्कार मिळाला असता, पण…

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या दोन वर्षांत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत भारताकडून सर्वात जास्त बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत शमी आहे. या कामगिरीच्या जोरावर शमीला मोठा पुरस्कार मिळाला असता, पण फक्त त्याच्या बायकोमुळे त्याला हा पुरस्कार मिळताना दिसत नाही.

बीसीसीआयने शमीचा अर्ज पाठवला नाही…

maharashtra times

भारत सरकारने केंद्रीय पुरस्कारासांठी क्रीडा संघटनांकडून खेळाडूंच्या नामांकनाचे अर्ज मागवले आहेत. पण सलग दोन वर्षे शमी या पुरस्काराच्या नामांकनासाठी लायक असतानाही बीसीसीआय त्याच्या नामांकनाचा अर्ज केंद्र सरकारला पाठवू शकत नाही.

पत्नी ठरली कारण…

maharashtra times

अर्जुन पुरस्कारासाठी काही निकष आणि काही नियम असतात. शमी हा अर्जुन पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये बसत आहे. पण काही नियमांमध्ये शमी हा बसत नाही आणि यासाठी कारण ठरली आहे त्याची पत्नी हसीन जहा.

शमी पुरस्कारापासून वंचित, पण का…

maharashtra times

हसीनने असे नेमके काय केले आहे जेणेकरून लायक असतानाही शमीला अर्जुन पुरस्कार मिळू शकत नाही, याचा विचार तुम्ही करत असाल…

बायकोचे धक्कादायक आरोप

maharashtra times

शमीची पत्नी हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि हुंडा मिळवण्यासाठी बायकोला मारहाण, असे गंभीर आरोप केले होते. शमीच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायालयात याचिकाही दाखल केली गेली आहे. ज्या खेळाडूवर आरोप असतील आणि केस सुरु असेल त्याला अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरवता येऊ शकत नाही, असे म्हटले जाते.

शमी अर्जुन पुरस्कारापासून वंचित

maharashtra times

लायक असूनही बीसीसीआयने शमीचा अर्ज केंद्र सरकारला अर्जुन पुरस्कारासाठी पाठवलेला नाही. त्यामुळे फक्त बायकोच्या तक्रारीमुळे शमी हा अर्जुन पुरस्कारापासून वंचित राहीलेला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular