Home संपादकीय THE LEGEND जेव्हा चार्ली चापलीनसाठी बारा मिनिटंपर्यंत वाजल्या होत्या टाळ्या...

जेव्हा चार्ली चापलीनसाठी बारा मिनिटंपर्यंत वाजल्या होत्या टाळ्या…

LIFE STORY OF SIR CHARLIE CHAPLIN

SIR CHARLIE CHAPLIN INFORMATION

मुझे बारिश मे चलना काफी अच्छा लगता है ताकि मुझे कोई रोते हुए ना देख सके CHARLIE CHAPLIN

या कोणत्या फिल्म च्या ओळी नसून हे चार्ली चापलीन यांचे स्वतःचे शब्द आहेत . कॉमेडियन चार्ली चापलीन यांचे कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

लहानपणी ज्यांनी आपल्याला हसून-हसून पोटात दुखावले असे चार्ली यांचे सुरुवातीचे बालपणीचे जीवन फार कठीण प्रसंगात गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे चार्ली हे आतून किती दुखी होते याबाबत कोणालाही कल्पना नसेल.

चार्ली यांचे पूर्ण नाव चार्ली स्पेन्सर चापलीन असे होते.यांचा जन्म 16 एप्रिल 1889 ला इंग्लंडमध्ये झाला. चार्ली यांचे वडील स्पेन्सर हे दारूच्या नशेत धुंद राहायचे .

Sir Charles Spencer Chaplin (1889 – 1977) the English film actor and director. (Photo by Hulton Archive/Getty Images)

दारुमुळे चार्ली लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी चार्ली त्यांची आई आणि त्यांचा लहान भाऊ त्यांना वाऱ्यावर सोडून निघून गेले .वडील निघून गेल्यानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांच्या आई वरली आली .

म्युझियम मध्ये गायिका होत्या पण त्यांची जेवढी कमाई होती.तेवढ्यात फक्त त्यांचा दिवसाचे भागत होते . आई दिवस-रात्र महिन्यात करते याचे चार्ली त्यांना फार दुःख वाटायचे. त्याकाळात लंडनमध्ये बेरोजगारी खुप होते. कोणालाही लवकर रोजगार भेटत नव्हता.

वडील सोडून गेल्यानंतर त्यांच्या आईचा डोक्यावर विपरीत प्रभाव पडला त्या प्रभावामुळे त्यांना मानसिक रुग्णांच्या दवाखान्यामध्ये भरती करावे लागले. आई दवाखान्यात भरती असल्यामुळे लहान भावाची पूर्ण जबाबदारी चार्ली यांच्यावर आली .

लहान असतानाच त्यांनी लंडनमध्ये काम शोधण्यासाठी सुरुवात केली. चार्ली लहान असल्यामुळे त्यांना कोणीही काम देत नव्हते तें . एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी हसणे सोडले नाही.

त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य कधीही थांबले नाही. जिंदगी का जो दिन बीना हसे और मुस्कुराये गुजर जाये जिंदगी का सबसे बुरा दिन होता है या त्यांच्या काही प्रसिद्ध पंक्ती आहेत..

आई एक स्टेज आर्टिस्ट असल्यामुळे त्यांना सुद्धा त्या कामांमध्ये रस होता . चार्ली लहानपणी हाताला येईल ते काम करायचे. काही दिवसांनी सर्कसमध्ये काम करून स्वतःचे भागवले . त्यांना अभिनयामध्ये फार रस होता.

एकोणीस वर्षाचे असताना त्यांनी fried karnas companies नामक एका नाटक कंपनीसोबत करार केला .ती कंपनी त्यांना अमेरिका मध्ये घेऊन गेली .आणि त्यांच्या वाटेला यश आले .

त्यांच्या अभिनयाने आणि कॉमेडियन स्वभावाने सगळ्यांचे मन जिंकले होते . त्यांच्या कॉमेडी अवताराने ते एक आयकॉन बनले होते. नटखट , खोडकर या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना लाखो लोक पसंत करायचे .

सायलेंट चित्रपटापासून चार्ली यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली.चार्ली स्टेजवर आले लोकांच्या टाळ्या थांबायचं नाही . त्यांची आई सुद्धा एक स्टेज आर्टिस्ट होती आणि मुलगा हासुद्धा त्याच मार्गावर आला होता.

चार्ली इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांच्या नावामुळेच नाटकाचे आणि सिनेमागृहाच्या तिकीट हाऊसफुल असायचे .चार्ली यांनी तरुण वयातच फार नाव कमावले. त्याच्या नशिबाने त्यांना अशी साथ दिली कि ते रातोरात स्टार झाली.

त्यांच्या अभिनयाने सगळ्या जगाला त्यांनी हसवले the kid , The Circus ,city lights ,the Gold Rush, LimeLight,modern time ,the great Dictator अशीच काही त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत .

हे चित्रपट फक्त प्रसिद्ध नसून त्या काळातील सुपरहिट ठरले होते .अभिनयामध्ये हीट ठरल्यानंतर त्यांनी स्वतःची युनायटेड आर्टिस्ट नामक एक कंपनी सुरू केली . एडिटर एक्टर डायरेक्टर आणि इतर काही कलागुणांनी चार्ली संपूर्ण होते .

चार्ली हे सायलेंट चित्रपटाचे किंग होते. चार्ली यांचे नाव जेवढे प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे त्यांना जगातील अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.ऑस्कर या विश्वातला मोठ्या पुरस्काराने चार्ली यांना सन्मानित केले आहे .

चार्ली 19 वर्षाचे असतानाच त्यांना प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळाल्या ,त्यामागे त्यांची मेहनत आणि लगन हेच कारण आहे. 1925 मध्ये प्रसिद्ध अश्या आयुब मॅगझिनच्या लेखामध्ये येणारे ते पहिले अभिनेते होते .

1931 ला जेव्हा महात्मा गांधी गोलमेज परिषदा साठी लंडन मध्ये गेले होते तेव्हा कॅनिंग टाऊन मध्ये डॉक्टर केटीऑल यांच्या घरी महात्मा गांधी सोबत चार्ली यांची भेट झाली होती .या भेटीबाबत अनेक वर्तमानपत्रात वेगवेगळ्या गोष्टींवर उधाण चर्चा झाली होती.

चार्ली यांना हॉलीवुड प्रेम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे .प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे आणि मोठमोठे पुरस्कार मिळाले .

1972 मध्ये Oscar honorary Academy Award ने चार्ली यांना सन्मानित करण्यात आले जेव्हा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,तेव्हा एक विश्व रेकॉर्ड झाला.चार्ली यांना पुरस्कार दिल्यानंतर तिथल्या समावेश केलेल्या अभिनेता आणि दर्शकांनी त्यांच्यासाठी सतत बारा मिनिटं पर्यंत स्टँडिंग ओवेशन आणि टाळ्या वाजवल्या होत्या .

ऑस्कर’च्या जगातील एक रेकॉर्ड आहे आणि हा पुरस्कार त्यांचा ऑस्कर मधला पहिला पुरस्कार होता. त्याक्षणी चार्ली खूप जास्त भाऊकसुद्धा झाले होते.

चार्ली त्यांच्या विनोदासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच त्यांच्या आयुष्यातील विवादित घटनांमुळे सुद्धा प्रसिद्ध आहेत.1940 मध्ये आलेला त्यांचा चित्रपट द ग्रेट डिक्टेटर हा तानाशाह हिटलर यांच्या जीवनावर आधारित होता .

हा चित्रपट प्रसारित झाल्यानंतर अनेक विवाद मध्ये फसला . चार्ली यांच्यावर राजनीतिक आरोप देखील झाले . याच सोबत चार्ली यांचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याच्या घटना समोर आल्या.

स्वतःच्या अभिनयामुळे आणि प्रेम प्रसंगामुळे सुद्धा चार्ली प्रसिद्ध आहेत .चार्ली यांनी चार विवाह केलीत. पहिल्या तीन पत्नीला त्यांनी सोडले तीन पत्नीमुळे सुद्धा चार्ली अनेक विवादमध्ये फसले होते.वादामुळे ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले.

त्यांचे स्वित्झर्लंडमध्ये सुखी जीवन सुरु होते . 25 डिसेंबर 1977 रोजी स्वित्झर्लंड येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला .त्यांना झालेल्या वेगवेगळ्या प्रकृतिक रोगांमुळे त्यांचा मृत्यू झाला , असे प्रसारमाध्यमांमधून कळते .

तेव्हा तिथे स्विझरलँड मध्ये त्यांची चौथी पत्नी आणि त्यांचे मुलं यांच्यासोबत राहत होते . चार्ली यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ते प्रसिद्ध मध्ये होते . चार्ली च्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिव शरीराला जमिनीत पुरल्याच्या दोन दिवसानंतर पार्थिव शरीर चोरी झाले .

खड्डा खोदून ते शरीर बाहेर काढले होते आणि चोरी केले गेले होते . चार्ली यांच्या पार्थिव शरिराच्या बदल्यांमध्ये चोरांनी चार लाख डॉलरची मागणी केली होती . चार्लीच्या पत्‍नीने पोलिसांसोबत मिळून त्या चोरांना पकडले आणि चार्लीच्या शरीर परत जमिनीमध्ये पुरले.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या चार्ली चापलीन यांचे जीवन अनेक समस्यांनी आणि अडचणींनी जोडले होते. पण त्यांनी त्या अडचणींवर मात करून स्वतःला एक यशस्वी पुरुष बनवले.

यांचे जीवन यात्रा तुम्हाला वाचून कसे वाटले याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular