Home संपादकीय THE LEGEND गेट्स यांच्या खात्यातील पैसे संपायला लागतील २५६ वर्ष/LIFE STORY OF BILL GATES

गेट्स यांच्या खात्यातील पैसे संपायला लागतील २५६ वर्ष/LIFE STORY OF BILL GATES

LIFE STORY OF SIR BILL GATES

BILL GATES नावाने सगळेच लोक परिचित आहेत . bill gates मागच्या पंचवीस वर्षांमध्ये अठरा वेळा नंबर वन श्रीमंत व्यक्ती आहेत .

म्हणजेच जगभर झालेल्या श्रीमंताचे यादीमध्ये मागील 25 वर्षापासून तर आज पर्यंत बिल गेट्स हे अठरा वेळा श्रीमंतांच्या यादीमध्ये क्रमांक एक वर आहेत .

आता सध्यपरिस्थित जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची यादी मध्ये क्रमांक एक वर जेफ बेजोस आहेत . जेफ बेजोस हे AMAZON कंपनीचे मालक आहेत .यांची एकूण वार्षिक उत्पन्न 112 बिलियन डॉलर एवढे आहे.

2019 मध्ये बिल गेट्स यांचे वार्षिक उत्पन्न 96.5 बिलियन डॉलर एवढे होते . बिल गेट्स आता श्रीमंत यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत . आणि तिसर्‍या क्रमांकावर वॉरेन बफेट हे आहेत . bill gates यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी झाला होता .

ते वॉशिंग्टन येथील मध्यमवर्गीय परिवारामध्ये जन्मलेले होते . त्यांचे वडील विलियम गेट हे पेशाने वकील होते आणि त्याची आई मेरी मॅक्सवेल बैकअप बँक मॅनेजर या पदावर होत्या . बिल गेट्स लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते .

त्यांना लहानपणी असे वाटायचे की आपण समोर जाऊन मोठा व्यवसाय करावा आणि जगातल्या सगळ्या सोयी सुविधांचा उपभोग घ्यावा.त्याना शाळांमध्येसुद्धा सोळाशे पैकी पंधराशे नव्वद मार्क भेटायचे.

शाळेमध्ये शिकत असतानाच त्यांनी कंप्यूटर प्रोग्राम बनवला आणि त्या कम्प्युटर प्रोग्राम ला विकून त्यांनी ४२०० डॉलर इतकी कमाई केली . bill gates तेरा वर्षाचे असताना त्यांना एका प्रचलित अशा प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकले होते .

त्या शाळेच्या काही जुन्या वस्तू रद्दीमध्ये विकल्यानंतर शाळेने त्या पैशातून प्रोग्रामिंग करणारे काही कम्प्युटर घेतले . त्यातला एक जनरल इलेक्ट्रिक या मशीनवर बिल गेट्स यांनी पहिला कम्प्युटर प्रोग्राम बनविला. त्यात कंप्यूटर प्रोग्राम चे नाव टिक टॅक टो असे होते .

या कंप्यूटर प्रोग्राम ला आज आपण गेम असे म्हणतो . बिल गेट्स यांनी एक असा प्रोग्राम बनविला होता की ज्यामध्ये कंप्युटर आणि युजर या दोघांमध्ये शर्यत करता येईल. त्यानि करिअरची सुरुवात तेराव्या वर्षीच केली होती.

हॉवर्ड सारखे युनिव्हर्सिटीमध्ये गणित आणि कम्प्युटर सायन्स मध्ये त्यांनी दाखला सुद्धा घेतला होता , पण त्यांच्या बिझनेस मुळे त्यामध्ये लक्ष देऊ शकले नाही .15 वर्षाच्या असताना बिल गेट्स यांनी त्यांचे सीनियर मित्र पोल अलेक्स यांच्यासोबत एक सॉफ्टवेअर कंपनी बनवली .

त्या कंपनीचे नाव traf O data असे होते. पण या कंपनीमध्ये bill gates तेवढे यशस्वी होऊ शकले नाही. आणि पुढे 1975 मध्ये त्याच सीनियर मित्रासोबत मायक्रोसॉफ्ट ही कंपनी सुरू केली. कंपनीचे सुरुवात थोडी हळूवारपणे होते.

पण या कंपनीने सॉफ्टवेअर विकून विकून 1979 मध्ये 2.5 मिलियन डॉलरची कमाई केली .त्यावेळी या कंपनीमध्ये फक्त पंचवीस कर्मचारी होते . 1981 मध्ये याच कंपनीने 2.5 मिलियन डॉलर पासून तर सरळ सरळ 16 मिलियन डॉलरची कमाई केली .

या कंपनीमध्ये फक्त 25 कर्मचारी होते त्या कंपनीमध्ये 1981 ला 125 कर्मचारी झाले. आयबीएम आणि एप्पल सारखे इतर कंपनीसाठी मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर सुद्धा बनवले .

पण आयबीएम , एप्पल यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे त्यांचेही साझेदारी जास्त वेळ चालू शकले नाही . तरीसुद्धा ३१ वर्षात लहान असून सुद्धा अरब पती झाले होते त्यांनी त्यांच्या शाळेत शिक्षकांनासुद्धा ; मी 30 वर्षांमध्ये करोडपती होईल असे चॅलेंज केले होते .

सन 1995 मध्ये बिल गेट्स यांनी विंडोज मायक्रोसॉफ्ट 95 हे सॉफ्टवेअर लॉन्च केले . या सॉफ्टवेअरच्या विक्रीमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनी ला सगळ्यात जास्त फायदा झाला आणि बिल गेट्स हे त्या काळातील जगातील सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती बनले.

bill gates एवढी श्रीमंत व्यक्ती असतानासुद्धा त्यांना भरपूर दानधर्म करायला आवडतो . बिल गेट्स यांनी सन 2000 मध्ये bills and Melinda Gates Foundation bmgf या चॅरिटेबल ट्रस्ट ची सुरुवात केली जे ट्रस्टचे लक्ष म्हणजे ध्येय जागतिक स्तरावर स्वास्थ संबंधित सेवा पुरविणे, गरिबी कमी करणे आणि अमेरिकेमध्ये शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे .

सन 2008 मध्ये त्यांच्या चॅरिटेबल फाउंडेशन मध्ये लक्ष घालण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या त्यांच्या मोठ्या पदावरून सुद्धा राजीनामा दिलेला होता . आतापर्यंत बिल गेट्स यांनी त्यांच्या चॅरीटेबल फाउंडेशन च्या निमित्ताने 41.5 बिलियन डॉलरचे चारिटी केलेली आहे .

13 ऑक्टोबर 2017 मध्ये बिल गेट्स dementia Discovery fund या कंपनीमध्ये पन्नास मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे .डिमेन्शिया हा एक असा रोग आहे ज्यामध्ये रोगी ची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते .

या रोगावर उपचार करण्यासाठी त्यांनी त्या कंपनीमध्ये 50 मिलियन डॉलर गुंतवले आहेत .डिमेन्शिया या आजारावर शोध करण्यासाठी आणि या आजारावर औषध बनवण्यासाठी ज्या कंपनीत समोर येतील अशा स्टार्टअपवर सुद्धा 50 मिलियन डॉलर गुंतवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे .

बिल गेट्स दरवर्षाला 96.5 बिलियन डॉलर इतके कमावतात तर ते खर्ची कशी घालतात ? . बिल गेट्स यांचे Washington DC मध्ये 68 हजार स्क्वेअर फूट मध्ये एक आलिशान अप्रतिम आणि सुंदर घर आहे .

या घरांमध्ये स्विमिंग पूल पासून तर लायब्ररी पर्यंतचे प्रत्येक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.Bill gates यांच्या घरामध्ये 24 बाथरूम 6 किचन आणि एका वेळेस दोनशे लोक पार्टी करू शकतो एवढा मोठा एक हॉल आहे.

या घर बनविण्यासाठी सात वर्ष आणि 63 मिलियन डॉलर एवढे पैसे लागले आहे. बिल गेट्स यांच्या घरात 88,000 डॉलरची एक हायटेक कम्प्युटर स्क्रीन लागली आहे . Bill gates यांच्याकडे प्रायव्हेट जेट आणि वेगवेगळ्या महागड्या गाड्यांच्या कलेक्शन्स आहेत.

पेंटिंग्स आणि जुन्या ऐतिहासिक गोष्टींचे बिलगेट्स हे फार चाहते आहेत .1988 मध्ये विंसी होमर यांची पेंटिंग बिल गेट्स नी 35 मिलियन डॉलर मध्ये खरेदी केली होती .

लिओनार्दो द विंची यांनी लिहिलेले पत्र आणि लेख , 3 करोड डॉलर मध्ये खरेदी केली होती बिल गेट्स यांचेकडे यांच्याकडे एवढा पैसा आहे की जर एक मिलियन डॉलर रोज जरी खर्च केला तरी पुढचे 265 वर्षे त्यांच्या बँक अकाउंट खाली होण्यास लागतील.

टेनिस आणि गोल्ड चे चाहते बिल गेट्स यांनी the road ahead , Business @ The Speed of Thought ही प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत , बिल गेट्स नंतर त्यांची 50% संपत्ती ही चारीटेबल ट्रस्ट मध्ये टाकणार आहे .

एवढे श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा त्यांचा पूर्ण विश्वास हा दानधर्म करण्यामध्ये आहे . त्यामुळे बिलगेट्स गेल्यानंतर त्यांची आठवण एक श्रीमंत व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक मानवतावादी व्यक्ती म्हणून करण्यात येईल असे मला वाटते .

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स माध्यमातून नक्की कळवा .

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular