Home लेटेस्ट मराठी न्यूज LICच्या मुख्य कार्यालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा पाहा VIDEO fire...

LICच्या मुख्य कार्यालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा पाहा VIDEO fire in lic main office in beed mhkk | News


या ऑफिसमधील जुने दस्तावेज आणि संगणक महत्त्वाचे साहित्य जळून राख झालं.

बीड, 09 नोव्हेंबर : बीडमध्ये LICच्या मुख्य कार्यालयात पहाटेच्या सुमारास भीषण अग्नितांडव झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली असून लाखो कागदपत्र जळून खाक झाली आहे. बीड शहरातील नगर रोड वरील LICच्या ऑफिसला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत पूर्ण ऑफिस जळून खाक झालं असून प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.

या ऑफिसमधील जुने दस्तावेज आणि संगणक महत्त्वाचे साहित्य जळून राख झालं. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र ही आग आतपर्यंत धुमसत होती. आगीमुळे परिसरात तुफान धुराचे लोट पसरले होते.

हे वाचा-हिशेब देऊन गेलेले गडदे परत आलेच नाही,रत्नागिरी एसटी आगारात कंडक्टरची आत्महत्या

पहाटेच्या सुमारास आग लागल्याने पूर्ण आग पूर्ण ऑफिसमध्ये पसरली आग एवढी भीषण होती की ऑफिसमधल्या साहित्याचा अक्षरश कोळसा झाला आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप समोर आलं नाही. कसंच ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समोर येऊ शकलं नाही. या प्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे. ही आग धुमसत असल्यानं पुन्हा रौद्र रुप धारण करते त्यामुळे अग्निशमन दलाकडून पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.


Published by:
Kranti Kanetkar


First published:
November 9, 2020, 9:01 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular