Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020 : विराट मैदानात, अनुष्का स्टेडियममध्ये, दोघांचा खाणाखुणांचा खेळ virat-kohli-ask-anushka-sharma-if-she-has-eaten-from-field-video-viral-gh |...

IPL 2020 : विराट मैदानात, अनुष्का स्टेडियममध्ये, दोघांचा खाणाखुणांचा खेळ virat-kohli-ask-anushka-sharma-if-she-has-eaten-from-field-video-viral-gh | News


आयपीएल (IPL 2020)मध्ये रविवारी चेन्नई आणि बँगलोरमध्ये झालेल्या सामन्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्यातला अतिशय प्रेमळ प्रसंग प्रेक्षकांना अनुभवता आला.

दुबई, 29 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये रविवारी चेन्नई आणि बँगलोरमध्ये झालेल्या सामन्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्यातला अतिशय प्रेमळ प्रसंग प्रेक्षकांना अनुभवता आला. मैदानात फिल्डिंग करत असताना विराट आणि अनुष्का यांच्यामध्ये खाणाखुणांचा खेळ सुरू होता. अनुष्का शर्मा बँगलोरच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित राहून विराट कोहली आणि त्याच्या टीमला चिअर करताना दिसते. स्टॅण्डमधून विराटसाठी ‘फ्लाईंग कीस’ देण्यापासून ते उभं राहून टाळ्या वाजवण्यापर्यंत, ती संघाला पूर्ण पाठिंबा देते.

जानेवारी 2021 मध्ये आपण आई-बाबा होणार असल्याचं विराट आणि अनुष्का यांनी काहीच दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यानंतरही अनुष्का हिने अनेकवेळा पोस्टमध्ये आपल्या मातृत्वाबद्दलचा अनुभव शेअर केला होता. विराट आणि अनुष्का यांचा एबीडी व्हिलिअर्स याने समुद्रात असताना काढलेला फोटोसुद्धा भरपूर गाजला. ह्या सर्व पोस्टमधून दोघांमधलं निखळ प्रेम दिसून आलं.

असाच एक प्रेमळ प्रसंग घडला रविवारी झालेल्या सामन्यात घडला. विराटने मैदानातूनच त्याला पाहत असलेल्या अनुष्काला इशाऱ्यातून विचारलं की ‘तू काही खाल्लंस का?’ त्यावर तिने हळूवार हसून त्याला ‘हो’ असं उत्तर दिलं. त्यांचं हे ऑन-फिल्ड प्रेम चाहत्यांनाही चांगलंच भावलं आहे. अनेक फॅन्सनी ह्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनुष्का आणि विराट, हे जोडपं ‘विरुष्का’ या नावाने ओळखलं जाते. त्यांचं इतक्या वर्षांचं प्रेम आणि एकमेकांसाठीची काळजी ही अनेक ठिकाणी सर्वांसमोर दिसून येते. ते दोघेही आपल्या प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करण्यात अजिबात लाजत नाहीत, तसंच आपल्या प्रेमाचा अभिमानही बाळगत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.


Published by:
Shreyas


First published:
October 29, 2020, 4:32 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular