Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020 : रोहित खेळणार का नाही? पोलार्डने दिली महत्त्वाची माहिती cricket-ipl-2020-kieron-pollard-give-update-on-rohit-sharma-injury-mhsd...

IPL 2020 : रोहित खेळणार का नाही? पोलार्डने दिली महत्त्वाची माहिती cricket-ipl-2020-kieron-pollard-give-update-on-rohit-sharma-injury-mhsd | News


IPL 2020 रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या अनुपस्थितीमध्ये मुंबई (Mumbai Indians) मैदानात उतरत आहे. कायरन पोलार्ड (Kieron Pollard)ने रोहितच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

दुबई, 31 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थितीमध्येही मुंबई (Mumbai Indians) शानदार कामगिरी करत आहे. आधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 9 विकेटने पराभव केला, याचसोबत मुंबई आता त्यांच्या पुढच्या मॅचचे तसंच इतर टीमच्या मॅचचे निकाल काहीही लागले तरी पहिल्या दोनमध्ये राहणार आहे, त्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये दोन मॅच खेळण्याच्या संधी मिळणार आहेत.

पंजाब (KXIP)विरुद्ध झालेल्या डबल सुपर ओव्हरच्या मॅचवेळी रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे तो टीममधून बाहेर आहे. रोहितच्या गैरहजेरीमध्ये मुंबई सलग 4 मॅच मैदानात उतरली आहे. रोहितऐवजी मुंबईने कायरन पोलार्डला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. या 4 मॅचपैकी 3 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे, त्यामुळे रोहित टीममध्ये नसताना मुंबईला फार अडचणींचा सामना करावा लागला नाही.

दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ने रोहितच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. ‘रोहितची तब्येत दिवसेंदिवस सुधारत आहे, तो लवकरच मैदानात उतरेल, अशी आम्हाला आशा आहे. रोहितच्या पुनरागमनाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत,’ असं पोलार्ड म्हणाला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लीग स्टेजमध्ये आता मुंबईचा केवळ 1 सामना राहिला आहे. 3 नोव्हेंबरला मुंबई हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या दृष्टीने या मॅचचा निकाल काहीही लागला तरी त्यांच्या भवितव्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण आता मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोनपैकी एका क्रमांकावर कायम राहणार आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यातही रोहित शर्मा विश्रांतीच करेल, अशी शक्यता आहे.

रोहितला झालेल्या दुखापतीनंतर वाद निर्माण झाला होता. याच दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झालेली नाही, पण मयंक अग्रवाललाही रोहितसारखीच मांडीच्या स्नायूला दुखापत झाली, पण त्याला वनडे, टी-20 आणि टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं. तर रोहितऐवजी केएल राहुलला उपकर्णधार करण्यात आलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न झाल्यानंतर रोहित नेटमध्ये सराव करताना दिसला, यानंतर वाद आणखी वाढला. रोहितला दुखापत झाली आहे, मग तो नेटमध्ये सराव कसा करत आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला.


Published by:
Shreyas


First published:
October 31, 2020, 8:17 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular