Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020 : मॅकल्लम डायरीमध्ये काय लिहित होता? सोशल मीडियावर चर्चांना उधाण...

IPL 2020 : मॅकल्लम डायरीमध्ये काय लिहित होता? सोशल मीडियावर चर्चांना उधाण cricket ipl 2020 Brendon McCullum got trolled after KKR collapse against rcb see memes update gh | News


आयपीएल (IPL 2020) मध्ये बुधवारी कोलकाता (KKR)चा बँगलोर (RCB)ने दारुण पराभव केला. यानंतर मॅकल्लमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. ब्रॅण्डन मॅक्कलम (Brendon McCullum) ची वेगवेगळी मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाली.

दुबई, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये बुधवारी कोलकाता (KKR)चा बँगलोर (RCB)ने दारुण पराभव केला. टॉस जिंकून विराट कोहलीने बॉलिंगचा निर्णय घेतला आणि त्याने बॉल मोहम्मद सिराजच्या हातात दिला. यानंतर सिराजने इतिहास घडवला. त्याने 2 ओव्हर मेडन टाकत कोलकात्याच्या 3 बॅट्समनना माघारी धाडलं. आयपीएलच्या एकाच मॅचमध्ये दोन ओव्हर मेडन टाकणारा सिराज पहिला बॉलर ठरला.

सिराजने दिलेल्या या धक्क्यातून कोलकाता सावरलीच नाही आणि त्यांना 20 ओव्हरमध्ये फक्त 84 रन करता आल्या. 20 ओव्हर खेळून केलेला हा स्कोअर आयपीएल इतिहासातला सगळ्यात कमी आहे. कोलकात्याची बॅटिंग अशाप्रकारे गडगडत असताना त्यांचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्कलम डायरीमध्ये काही तरी लिहित असल्याचं कॅमेरामध्ये दिसलं, यानंतर मॅकल्लमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.

ब्रॅण्डन मॅक्कलम (Brendon McCullum) ची वेगवेगळी मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. आयपीएलमध्ये कोलकात्याच्या टीमने मोसमाच्या मध्येच कर्णधार बदलला. दिनेश कार्तिकच्या ऐवजी कोलकात्याने इयन मॉर्गनकडे नेतृत्व दिलं. मॉर्गनकडे नेतृत्व आल्यानंतर कोलकात्याने 3 पैकी 1 मॅच जिंकली, तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता 5 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.


Published by:
Shreyas


First published:
October 23, 2020, 9:18 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular