Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020 : बँगलोरचा सामना चेन्नईशी, विराटने टॉस जिंकला cricket-ipl-2020-rcb-vs-csk-virat-kohli-won-the-toss-and-elected-to-bat-first-mhsd | News

IPL 2020 : बँगलोरचा सामना चेन्नईशी, विराटने टॉस जिंकला cricket-ipl-2020-rcb-vs-csk-virat-kohli-won-the-toss-and-elected-to-bat-first-mhsd | News


आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये बँगलोर (RCB)ने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या मोसमात विराटची बँगलोर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर चेन्नई (CSK)ची कामगिरी मात्र अत्यंत खराब झाली आहे.

दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये बँगलोर (RCB)ने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या मोसमात विराटची बँगलोर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर चेन्नई (CSK)ची कामगिरी मात्र अत्यंत खराब झाली आहे. चेन्नईच्या टीमचं प्ले-ऑफला पोहोचणं आता जवळपास अशक्य आहे, त्यामुळे आता फक्त सन्मानासाठी चेन्नईची टीम मैदानात उतरणार आहे. बँगलोरच्या टीमने इसरू उडानाच्याऐवजी मोईन अलीला संधी दिली आहे. तर चेन्नईने जॉस हेजलवूड आणि शार्दुल ठाकूरच्याऐवजी मिचेल सॅन्टनर आणि मोनू कुमारला टीममध्ये घेतलं आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. बँगलोरने 10 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे. आजच्या मॅचमध्ये बँगलोरचा विजय झाला, तर त्यांचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित होईल.

बँगलोरची टीम

देवदत्त पडिकल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, गुरुकिरत मान, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

चेन्नईची टीम

ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, एन जगदीसन, एमएस धोनी, सॅम करन, रविंद्र जडेजा, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, इम्रान ताहिर, मोनू कुमार


Published by:
Shreyas


First published:
October 25, 2020, 3:15 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular