Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020: प्लेऑफमध्ये जागा मिळवूनही श्रेयस अय्यरसमोर ‘ही’ मोठी अडचण! | News

IPL 2020: प्लेऑफमध्ये जागा मिळवूनही श्रेयस अय्यरसमोर ‘ही’ मोठी अडचण! | News


पृथ्वी शॉचा खराब फॉर्म लक्षात घेऊन संघ काय निर्णय घेईल हे नक्कीच पाहण्यासारखं आहे.

अबु धाबी, 03 नोव्हेंबर : दिल्ली कॅपिटल्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र सलामी फलंदाज पृथ्वी शॉचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. सोमवारी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध शॉ केवळ 9 धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने बोल्ड केलं. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉच्या खराब फॉर्ममुळे दिल्ली कॅपिटल्सचा ताण वाढला आहे. दिल्लीची टीम प्लेऑफसमध्ये क्वालिफाय झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुढच्या महत्त्वपूर्ण सामान्यांसाठी पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याची गरज लागू शकते.

चमकल्यानंतर फ्लॉप शो

पृथ्वी शॉने या IPL सिझनमध्ये दणदणीत सुरुवात केली. मागील सिझनप्रमाणे या वेळेस त्याला स्विंग बॉल्सचा त्रास झाला नाही. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 43 चेंडूत 64 धावा केल्या. यानंतर शारजाच्या मैदानावर केकेआरविरुद्ध शॉने 41 चेंडूंत 66 धावा केल्या. आरसीबीविरुद्ध त्याने 23 चेंडूंत 42 धावाही केल्या. पण त्यानंतर त्याचा सतत फ्लॉप शो सुरूच आहे.

वाचा-IPL 2020: या 5 खेळाडूंचं भवितव्य धूसर? 2021मध्ये कुठलीच IPL टीम करणार नाही खरेदी

नॉनस्टॉप फ्लॉप शो

पृथ्वी शॉने पहिल्या 6 सामन्यांमध्ये 198 धावा केल्या. त्याची सरासरी 33 इतकी होती. स्ट्राइक रेट 151 पेक्षा जास्त होता. पण त्यानंतर शॉचा नॉन स्टॉप फ्लॉप शो सतत सुरू आहे. शॉने शेवटच्या 6 सामन्यांत 5 च्या सरासरीने केवळ 30 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉला धावा करताना दहाचा आकडाही स्पर्श करता आलेला नाही आणि दोनदा खातंही न उघडता बाद झाला. प्रत्येक सामन्यात, तो फ्लॉप होत आहे.

वाचा-70 मिनिटं नाही 240 चेंडू, आता शाहरुखच्या KKRचं नशीब मुंबई इंडियन्सच्या हाती

आउटस्विंग चेंडू खेळताना पृथ्वी कमी पडतोय का?

पृथ्वी शॉ जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असते. परंतु खराब फॉर्ममुळे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असताना तो पुन्हा पुन्हा चुका करत बाद होतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या आकडेवारीनुसार, चालू सिझनमध्ये शॉने 20 आउटस्विंग बॉलमध्ये 21 धावा केल्या आहेत. यावेळी तो 3 वेळेस बाद झाला आहे. त्यामुळे आउटस्विंग खेळताना त्याला त्रास होतो आहे असं दिसतंय. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म लक्षात घेऊन संघ काय निर्णय घेईल हे नक्कीच पाहण्यासारखं आहे.


Published by:
Priyanka Gawde


First published:
November 3, 2020, 3:33 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular