Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020 : चेन्नईची बॅटिंग गडगडली, मुंबईला 115 रनचं आव्हान cricket ipl...

IPL 2020 : चेन्नईची बॅटिंग गडगडली, मुंबईला 115 रनचं आव्हान cricket ipl 2020 chennai batting collapse against Mumbai CSK vs MI mhsd | News


आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची बॅटिंग पुन्हा गडगडली आले. मुंबई (Mumbai Indians)च्या भेदक बॉलिंगपुढे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 114 रन करता आले.

शारजाह, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची बॅटिंग पुन्हा गडगडली आले. मुंबई (Mumbai Indians)च्या भेदक बॉलिंगपुढे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 114 रन करता आले. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या मुंबईची सुरुवात दिमाखात झाली. ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी चेन्नईच्या पहिल्या 4 विकेट 3 रनमध्येच काढल्या. या धक्क्यांनंतर चेन्नईची टीम सावरू शकली नाही. एकट्या सॅम करनने एका बाजूने किल्ला लढवला. करनने 47 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली.

मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि राहुल चहरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर-नाईलला 1 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ची टीम कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरली आहे. रोहितऐवजी कायरन पोलार्डकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माऐवजी सौरभ तिवारीला मुंबईच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर चेन्नईने शेन वॉटसनच्याऐवजी इम्रान ताहिरला संधी दिली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम तिसऱ्या तर चेन्नई शेवटच्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नईला या मॅचमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.

मुंबईची टीम

क्विंटन डिकॉक, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

चेन्नईची टीम

सॅम करन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, एन जगदीशन, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जॉस हेजलवूड, इम्रान ताहिर


Published by:
Shreyas


First published:
October 23, 2020, 7:13 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular