Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020: खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल! केएल...

IPL 2020: खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल! केएल राहुलनं व्यक्त केला राग | News


IPL 2020: अम्पायरच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब IPL बाहेर, वाचा काय आहे प्रकरण.

अबू धाबी, 02 नोव्हेंबर : किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) संघ आयपीएलच्या या हंगामातून बाहेर गेला आहे. रविवारी झालेल्या अखेरच्या लीग सामन्यात पंजाबला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पराभव स्विकारावा लागला. पराभवानंतर कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) अम्पायरच्या एका निर्णयामुळे संघ आयपीएल बाहेर गेल्याचे सांगितले. किंग्ज इलेव्हनचा पहिलाचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला होता. या सामन्यात पंजाबला एका शॉर्ट रनचा फटका बासला. हा सामना पंजाबच जिंकणार होता, मात्र सामना सुपरओव्हरमध्ये गेला आणि पंजाबनं सामना गमावला. त्यानंतर पंजाबनं सलग सामने गमावले. मात्र त्यानंतर सलग 5 विजय मिळवत कमबॅकही केला. मात्र दोन सामने गमावल्यामुळे त्यांना आयपीएल बाहेर पडला.

राहुलनं चेन्नईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर, “हे निराशाजनक आहे. काही सामन्यांमध्ये आम्ही चांगल्या स्थितीत होतो, मात्र निकाल आमच्या बाजूने लागला नाही. यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. दिल्लीविरुद्धचा शॉर्ट रन आम्हाला महागात पडला. चेन्नईविरुद्ध आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. या सामन्यावर आमच्यावर दबाव होता. आम्हाला वाटलं होतं 180-190 धावा काढू मात्र हे होऊ शकलं नाही”. पंजाबनं सलग दोन सामना गमावल्यामुळे त्यांना आयपीएल बाहेर पडावे लागले.

वाचा-IPL 2020 : पंजाबनंतर राजस्थानही आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याचा दणदणीत विजय

काय आहे शॉर्ट रन प्रकरण?

20 सप्टेंबर रोजी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबला जिंकण्यासाठी 157 धावांची गरज होती. अखेरच्या षटकात पंजाबला 13 धावांची आवश्यकता होती आणि अग्रवालने पहिल्या तीन चेंडूंमध्ये 12 धावा केल्या. पंजाबचा संघ एक धाव मागे होता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सामना सुपर ओव्हरवरमध्ये जाण्यापूर्वी टीव्ही फुटेजमध्ये स्क्वेअर लेग पंच मेननने ख्रिस जॉर्डनला 19व्या ओव्हरमधील तिसर्‍या चेंडूवर ‘शॉर्ट रन’साठी रोखले. मात्र टीव्ही रीप्लेवरून हे स्पष्ट झाले की जेव्हा त्याने पहिला रन पूर्ण केला तेव्हा जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत होती. मात्र मेनन यांनी जॉर्डनने क्रीजपर्यंत पोहचला नाही म्हणून एकच धाव दिली. तांत्रिक पुरावे असूनही पंचांनी या निर्णय बदल केला नाही.

वाचा-IPL 2020 : कार्तिकचा तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

दिग्गजांनी पंचांना सुनावले

दरम्यान, याबाबत माजी भारतीय ओपनर विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करीत लिहिले आहे की, मी मॅन ऑफ द मॅच निवडीबाबत समर्थन देत नाही. ज्या अम्पायरने याला शॉर्ट रन दिले आहे, त्याला खरं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायला हवं. शॉर्ट रन नसतानाही त्याने तो निर्णय घेतला. तर संघ मालकिन प्रीती झिंटानेही या निर्णयावरून पंचांना सुनावले.


Published by:
Priyanka Gawde


First published:
November 2, 2020, 11:05 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular