Home लेटेस्ट मराठी न्यूज IPL 2020 : अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाने जर्सी का झळकावली? पाहा कारण...

IPL 2020 : अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाने जर्सी का झळकावली? पाहा कारण cricket-ipl-2020-nitish-rana-tribute-to-his-father-in-law-surinder-marwah-who-passed-on-friday-kkr-vs-dc-mhsd | News


आयपीएल (IPL 2020)च्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)च्या बॅट्समनने जोरदार फटकेबाजी केली. कोलकात्याला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवण्यात नितीश राणा (Nitish Rana)आणि सुनिल नारायण (Sunil Narine)यांनी मोलाची भूमिका बजावली.

अबु धाबी, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)च्या बॅट्समनने जोरदार फटकेबाजी केली. पहिले बॅटिंग करताना कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 194 रन केले. कोलकात्याला या स्कोअरपर्यंत पोहोचवण्यात नितीश राणा (Nitish Rana)आणि सुनिल नारायण (Sunil Narine)यांनी मोलाची भूमिका बजावली. नितीश राणाने या मॅचमध्ये अर्धशतक केल्यानंतर सेलिब्रेशन न करता कोलकात्याची जर्सी झळकावली.

नितीश राणाने या मॅचमध्ये 35 बॉलमध्येच अर्धशतक झळकावलं. अर्धशतक केल्यानंतर त्याच्याकडे कोलकात्याचा दुसरा खेळाडू रिंकू डग आऊटमधून आला आणि त्याच्या हातात ही जर्सी दिली. नितीशने झळकावलेल्या या जर्सीवर सुरेंदर हे नाव लिहलं होतं. सुरेंदर हे नितीश राणाच्या सासऱ्यांचं नाव आहे. शुक्रवारी नितीशच्या सासऱ्यांचं निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नितीशने त्यांच्या नावाची जर्सी झळकावली.

नितीश राणाने दु:खाच्या या काळातही मैदानात उतरून टीमसाठी अर्धशतकी खेळी केली. या मोसमातली नितीशचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेल्या नितीशने 13 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 81 रन केले. कोलकात्याने स्कोअर 7.2 ओव्हरमध्ये 42 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण नितीशने सुनिल नारायणसोबत 115 रनची पार्टनरशीप करुन कोलकात्याला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं. सुनिल नारायणने 32 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली, यामध्ये 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता.


Published by:
Shreyas


First published:
October 24, 2020, 6:31 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular