Home लेटेस्ट मराठी न्यूज World iPhone घेण्यासाठी 9 वर्षांपूर्वी किडनी विकली; आता अशी झाली अवस्था man sold...

iPhone घेण्यासाठी 9 वर्षांपूर्वी किडनी विकली; आता अशी झाली अवस्था man sold Kidney 9 years ago to get an iPhone now-suffering mhkb | Viral


आयफोन खरेदी करण्यासाठी किडनी विकावी लागेल असा जोक व्हायरल होत असतो. पण एकाने हा जोक खरोखरचं सत्यात उतरवला आहे. आयफोन घेण्यासाठी त्याने चक्क आपली किडनी विकल्याची घटना समोर आली आहे.

बिजिंग, 21 नोव्हेंबर : एखाद्याकडे आयफोन (iPhone) असणं हे स्टेटस सिम्बल मानलं जातं. दरवर्षी एखादा नवा आयफोन लाँच झाल्यानंतर, आयफोन खरेदी करण्यासाठी किडनी विकावी लागेल असा जोक व्हायरल होत असतो. पण एकाने हा जोक खरोखरचं सत्यात उतरवला आहे. आयफोन घेण्यासाठी त्याने चक्क आपली किडनी विकल्याची घटना समोर आली आहे. 25 वर्षीय तरूणाने 2011 मध्ये दोन apple फोन खरेदी करण्यासाठी किडनी विकली होती.

‘इंडिया टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण चीनमधलं आहे. 25 वर्षीय वांग शांगकु नावाच्या तरूणाने 2011 मध्ये त्याची एक किडनी विकली. त्यावेळी त्याचं वय अवघं 17 वर्ष होतं. त्याने किडनी ब्लॅक मार्केटमध्ये $3273 अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास 2,42,735 रुपयांत विकली. या रकमेतून त्याने एक iPhone 4 आणि iPad 2 खरेदी केला होता.

(वाचा – Government Job: कॅनरा बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज)

बेकायदेशीरपणे काढली किडनी –

या तरूणाने हुनान प्रांतात बेकायदेशीरपणे शस्त्रक्रिया केली. यात त्याने उजव्या बाजूची किडनी काढली. ही गोष्ट 9 वर्षांपूर्वीची आहे. पण आता मात्र त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. आता वांग शांगकु एका किडनीच्या कमतरतेमुळे डायलिसिस मशीनवर आहे. त्याला आता पुढे आयुष्यभर बेडरेस्टच राहावं लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(वाचा – संपूर्ण पथकासह NCB चा भारती सिंहच्या घरावर छापा, ड्रग प्रकरणात नाव आल्याने खळबळ)

एक किडनी काढल्यानंतर…

वांगने बेकायदेशीरपणे शस्त्रक्रिया करुन एक किडनी काढून घेतली. पण या शस्त्रक्रियेच्या काही महिन्यांनंतर, त्याच्या दुसऱ्या किडनीला संसर्ग झाला.

(वाचा – एका डेटसाठी अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं,गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य)

जशी वर्ष सरत गेली तशी त्याची स्थिती अधिकच गंभीर होत गेली. आता त्याला रोज डायलिसिस करावं लागतं. केवळ हौशेसाठी आयफोनच्या नादात या तरूणाने आपलं संपूर्ण आयुष्यचं खराब केलं.


Published by:
Karishma Bhurke


First published:
November 21, 2020, 5:32 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular