Home Uncategorised health news News : उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी - take care of...

health news News : उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी – take care of skin in summer


मुंबई टाइम्स टीम

सध्या वर्क फ्रॉम होम करताना दिवसातला बराचसा वेळ स्क्रीनसमोर जातो. अगदी खाताना किंवा जेवण बनवताना कॉल घेणं, मीटिंग करणं अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पण कार्यपद्धतीत आणि जीवनपद्धतीत झालेला बदलांचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर होत असतो. सद्यस्थितीत त्वचेची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे, हे जाणून घ्या…

० बर्फाचा वापर करा

उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तोंड स्वच्छ धुऊन त्यावर बर्फ फिरवा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.

० नियंत्रण गरजेचं

वर्क फ्रॉम होम करताना तुमच्या खाण्यावर नियंत्रण असणं तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः गोड पदार्थांचं प्रमाण कमीच असू द्या. घरी आहात म्हणून चॉकलेट्स, फळांचे रस आणि इतर कॅलरीयुक्त पदार्थ खाणं टाळा. गोडाचं प्रमाण जास्त झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला गोड खावंसं वाटेल तेव्हा फळं खा.

० घ्या खास काळजी

त्वचेच्या काही विशिष्ट भागाची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, पिगमेंटेशन किंवा सुरकुत्या ज्या भागात येतात त्या भागाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. याला उत्तम पर्याय म्हणजे फेस मास्क ट्रीटमेंट होय. अगदी घरच्या घरी बनवता येईल आणि तुमच्या त्वचेला योग्य असा फेस मास्क लावा. फेस मास्क लावल्यानंतर त्यावर फेस रोलर फिरवा, यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होते. त्वचेला नैसर्गिकरित्या तेज हवं असेल तर व्यायाम करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.

० क्रीमचा वापर करा

आपण सतत लॅपटॉप, स्मार्टफोनच्या स्क्रीन समोर असल्यानं डोळ्यांच्या खालच्या त्वचेस हानी पोहोचू शकते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी डोळ्यांखाली क्रीम लावा. जेणेकरून त्वचा भरून निघण्यास मदत होईल. त्याच सोबत रात्री झोपण्यापूर्वी त्वचा मॉइश्चराइझ करा.

० तेलाचा उत्तम पर्याय

त्वचेला तेज येण्यासाठी तेलाचा वापर होऊ शकतो. हा उत्तम पर्याय आहे. तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर बदाम तेला मानेपासून पायांच्या बोटांपर्यंत लावा. साधारण एक तास थांबून मग ते आंघोळ करा. नंतर पूर्ण त्वचा मॉइश्चराइझ करा.

० घरगुती स्क्रबचा वापर

सध्या घराबाहेर पडत नसूनही त्वचेवर तेलकटपणाचा थर येतो. उन्हाळ्यात तर त्वचेची चमक कमी होते. यावर उपाय म्हणून आठवड्यातून दोन वेळा फेस स्क्रब वापरा. स्क्रब वापरल्यानं डेड ससेल्स निघून जाण्यास मदत होते.

ब्लॅकहेड्ससाठी घरगुती स्क्रब

पाव वाटी ओटमील, एक टेबलस्पून बेकिंग सोडा आणि एक टेबलस्पून लिबांचा रस एका बाऊलमध्ये एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुऊन तो स्क्रब त्वचेवर लावा. स्क्रब लावताना त्वचा ओलसर असावी. साधारण एक मिनिटापर्यंत स्क्रब करा. ब्लॅकहेड जास्त आहेत अशा ठिकाणी विशेष काळजी घ्या. नंतर त्वचा स्वच्छ पाण्यानं धुऊन कोरडी करून घ्या. त्यानंतर त्वचा मॉइश्चराइझ करायला विसरू नका.

संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular