Home संपादकीय आरोग्यव्यवस्था कोलमडली मंत्री झाले कोरंटाईन

आरोग्यव्यवस्था कोलमडली मंत्री झाले कोरंटाईन

Source

राज्यात सरकार आहे की नाही याची प्रचिती यायला लागली आहे. मुख्यमंत्री आपल्या घरून मंत्रालय चालवत आहे. यांनी स्वतःला स्वतःच्या बंगल्यावर कोंडून घेतलय . अख्ख मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कोरोना साठी हजेरी देत आहे .शिवाय राज्याचे मंत्री ,आमदार व नेतेही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हजेरी लावून अडलेली कामं करून घेत आहे .सध्या व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे अख्या महाराष्ट्राचा संसार मुख्यमंत्र्यांच्या घरून सुरू आहे .

मंत्रालय सुन्न झालाय .मंत्रालयाचे मोजके कर्मचारी मंत्रालयात येतात .लोकांचा ओघ शून्य झाला आहे .मंत्रालयाकडे लाखो लोकांनी पाठ फिरवली आहे .कोरोनाच्या भीतीने मुंबईकरांनी स्वतःला कोंडून घेतलाय .मुंबई आणि परिसर कोरूना ग्रस्त झाला आहे. आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. सगळे व्यवहार ठप्प झाले आहे .विमानसेवा, रेल्वे, बस इत्यादी बंद करण्यात आली आहे .

कोरूनाने माणसाच्या नाका-तोंडावर बंदी आणली तसेच फिरण्यावर बंदी आणली आहे. सगळं काही ठप्प झालाय .अशा अवस्थेत शासनाकडे ही पर्यायी मार्ग उरला नाही .आरोग्य व्यवस्था पूर्णतहा कोलमडलेली आहे. दवाखान्यात कोरूना रुग्णांची संख्या वाढत आहे .रोज शेकडो कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. उपचारासाठी दवाखान्याची व्यवस्था शासनाने केली आहे .औषधांचा तुटवडा आहे .

कोरुनाच्या नावाखाली औषध उपचारासाठी मोठ्या मशिनी खरेदी केल्याआहे पण त्या चालवण्यासाठी टेक्निशियन नाही . कोरूना रूग्णांसाठी नवीन वार्ड तयार होत आहे. पण त्यात कामकरासाठी परिचारिका नाही .एका परिचारिकेकडे एका वार्डातील लोकांवरऔषधउपचार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे .

वस्तविक्ता एका वार्डसाठी किमान सहा परिचारिकांची गरज भासते ,मात्र या दवाखान्यातील अधिष्ठाता यांनी असे करून परिचारिकांचा जीव घ्यायचे षडयंत्र रचले की काय? असे वाटते . एका वर्डचा भार एका परिचारिकेवर आल्याने त्या परिचारिकांची होत असलेली पायपीट पाहवली जात नाही .

वरिष्ठ दर्जाचे आरोग्य अधिकारी फक्त आर्डर फर्मावतात. पण ग्राउंड लेव्हलला काम करासाठी कर्मचारी नाही .त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या दवाखान्यात अशीच अवस्था आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात तर भयावह परिस्थिती आहे .या दवाखान्यात कोरूना चे वार्ड रोज नव्याने उघडल्या जात आहे .

मात्र परिचारिकांचा तुटवडा या कारणाने रुग्णांची हेळसांड होत आहे. अधिष्ठाता फक्त आदेश देऊन काम करून घेत आहे. मात्र अपुरे मनुष्यबळ हे जीवघेणी ठरत आहे .मंत्र्यांची मर्जी संपादन करण्यासाठी नवीन वार्डची निर्मिती केली जात आहे . यामुळे परिचारिकावर कामाचे प्रचंड ओझे वाढले आहे .

याची दखल आरोग्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे . ही ऋग्नसेवा कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी परीचारिकावरती वाढलेले कामाचे ओझे थोडे कमी करण्याबाबत विचार केला पाहिजे. अन्यथा 24तास राबणाऱ्या आरोग्य सेविका ,परिचारिका, डॉक्टर यांची कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही व आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न शासनासमोर पुन्हा उभा होईल !

शासनाने नियुक्त केलेल्या चारशे परिचारिकांपैकी काही परिचारिकांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व मेडिकल सारख्या रुग्णालयात तात्काळ पाठवणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा व त्यात काम करणाऱ्या डॉक्टर परिचारिका यांना विश्रांतीचीही गरज आहे .पण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेले अधिष्ठाता मनमर्जी करीत असल्याने परिचारिका डॉक्टर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे .

या रुग्णालयात परिचारिकांची अपुरी संख्या असतानासुद्धा नवीन वार्ड उघडल्या जात आहे .त्यामुळे परीचारिकाकडून अधीकचे काम करून घेतल्या जात आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याआहे .

यावर सुद्धा मुख्यमंत्री वआरोग्यमंत्र्यांनी त्वरीत दखल घेणे गरजेचे आहे .सध्या महाराष्ट्राचा कारभार मुख्यमंत्री घरूनच करत असल्याने वेळ व खर्च वाचत आहे. ही आनंदाची बाब आहे .पण उंटावरून शेळ्या हाकल्यासारखं हे काहीसं होत आहे .पण परिस्थिती तशी आहे हे आपण समजलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular