Home शहरं Mumbai Drugs प्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला NCBनं केली अटक, पतीचीही कसून चौकशी |...

Drugs प्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला NCBनं केली अटक, पतीचीही कसून चौकशी | Crime


भारती आणि तिच्या पतीनं ड्रग्स घेतल्याचं कबूल केलं

मुंबई, 21 नोव्हेंबर: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh) हिला ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (Narcotics Control Bureau) अखेर अटक केली आहे. भारतीचा पती हर्ष लिम्बाचिया(Harsh Limbachiya) याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. हर्षची कसून चौकशी सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे NCB च्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यानं ड्रग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. भारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

हेही वाचा…तारक मेहता का उल्टा चश्माच्या घरात पोहोचला कोरोना; सेटवर चिंतेचं वातावरण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh) आणि तिचा पती हर्ष यांचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर ड्रग्स प्रकरणात एनसीबीनं छापेमारी केली. या छापेमारीतून नार्कोटिक्स कंंट्रोल ब्युरोने काही प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त केले आहेत,  अशी माहिती समीर वानखेडे (आयआरएस झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई) यांनी दिली आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने ही छापेमारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीच्या ठिकाणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीला या दाम्पत्याच्या ड्रग सेवनाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीत काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

टेलिव्हिजनच्या माध्यमातून भारती सिंह हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. अशावेळी तिच्या घरावर ड्रग प्रकरणात झालेली छापेमारी तिच्या चाहत्यांसाठी आणि टेलिव्हिजन विश्वासाठी खळबळजनक आहे.

हेही वाचा…अमृता फडणवीसांच्या गाण्यावरील टीकेवरुन महेश टिळेकर-आरोह वेलणकर यांच्यात खडाजंगी

काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणात अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्याची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) यांची देखील चौकशी केली होती. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या बड्या अभिनेत्रींचीही एनसीबीने आतापर्यंत चोकशी केली आहे. बॉलिवूडप्रमाणेच सँडलवूडमध्ये देखील ड्रग प्रकरणाची पाळमुळं पोहोचली आहेत. या इंडस्ट्रीमध्ये देखील आतापर्यंत अनेक अटक करण्यात आल्या आहेत.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 21, 2020, 7:04 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular