Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra coronavirus in mumbai: मुंबईत कोणत्याही स्थितीला तोंड देण्याची तयारी; १ लाख बेडची...

coronavirus in mumbai: मुंबईत कोणत्याही स्थितीला तोंड देण्याची तयारी; १ लाख बेडची व्यवस्था करणार! – coronavirus: will provide one lakh beds in mumbai, says rajesh tope


मुंबई: मुंबई शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा ह्या करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच येत्या सोमवारपासून वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

करोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना पुरेशा खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली आहे. नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही अशा प्रकारे करोना केअर सेंटर्स उभारली जातील असे टोपे म्हणाले.

येत्या सोमवारपासून बीकेसी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांची क्षमता असलेला अतिदक्षता विभाग देखील सुरू केला जात आहे. दरम्यान, मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा करोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बीकेसीमधील करोना केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी माध्यमांना टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

टोपे म्हणाले…

१. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ६०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्यालगत असलेल्या नेहरू प्लॅनेटोरियम येथेही सुमारे ५०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.

२. गोरेगाव येथील सुविधा केंद्र आठवडाभरात सुरू होईल. बीकेसी येथील करोना केअर सेंटर केवळ २० दिवसांमध्ये तयार करण्यात आले आहे. त्याममध्ये १ हजार ८ खाटांची सुविधा असून तेथे नव्याने एक हजार खाटांचे अतिदक्षता विभागसुद्धा उभारला जात आहे.

३. मुंबईत करोना केअर सेंटरचे एक आणि दोन अशा प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात क्वारंटाइन आणि आयसोलेशनची व्यवस्था असेल. मुंबईत करोना केअर सेंटर २ मध्ये सुमारे एक लाख आयसोलेशन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

४. जूनपर्यंत रुग्ण दुपटीचा वेग पाहता अधिक काळजी घेण्यात येत आहे. मात्र ज्या गणितीय शास्त्रानुसार मुंबईत रुग्ण वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला होता, तेवढ्या रुग्णांची वाढ झालेली नाही. लॉकडाऊनचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

५. मुंबईतील खासगी रुग्णालयातील सुमारे ७५ टक्के खाटा सध्या वापरात नाहीत. अपघात, बाळंतपण, डायलेसीस, पक्षाघात, हृदयविकार या आजारांच्या रुग्णांना प्राधान्य देत उर्वरित खाटांमधील ६० टक्के खाटा करोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, त्यासाठी खासगी रुग्णालयांना राज्य शासन, महापालिकांमार्फत त्यांची देयके दिली जातील, अशा मागणीचा प्रस्ताव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर येत्या एक दोन दिवसात निर्णय होऊ शकतो.

६. राज्यभरातील आरोग्य विभागातील १७ हजार ३३७ रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार पदे तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून, लॉकडाऊनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर दिला जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular