Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra Corona package: करोनाचं पॅकेज म्हणजे टीव्हीवरील सीरियल नाही; अशोक चव्हाणांचा टोला -...

Corona package: करोनाचं पॅकेज म्हणजे टीव्हीवरील सीरियल नाही; अशोक चव्हाणांचा टोला – congress leader ashok chavan slams bjp over corona package


मुंबई: केंद्र सरकारने करोनासाठी जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे. अर्थसंकल्पात जाहीर करावयाच्या दीर्घकालीन उपाय म्हणजे पॅकेज असू शकत नाही, अशी टीका करतानाच एका दिवसातही या पॅकेजची घोषणा करता आली असती. दररोज घोषणा करायला करोनाचं पॅकेज काय टीव्हीवरील सीरियल आहे काय? असा संतप्त सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज तिसऱ्या टप्प्यातील करोना पॅकेज जाहीर केलं. त्यावर अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या आजच्या पॅकेजमध्ये थेट मदत म्हणून शेतकऱ्यांना साधा रुपयाही मिळालेला नाही. आजच्या घोषणांमध्ये बहुतांश घोषणा पायाभूत सुविधांशी निगडित भविष्यकालीन व दीर्घकाळाच्या उपाययोजना आहेत. अशा घोषणा साधारणतः अर्थसंकल्पात केल्या जातात, असं चव्हाण म्हणाले.

खरीपाच्या तयारीसाठी आज शेतकऱ्यांना थेट भरीव मदतीची गरज आहे. अधिकाधिक सुलभ पद्धतीने पुरेशा वित्तपुरवठ्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावरील कर्जाचा जुना बोजा कमी करण्याची गरज आहे. त्यांना कमीत कमी किंमतीत बी-बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करून देण्याची निकड आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारांकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याऐवजी काही पायाभूत सुविधा आणि नवीन नियमांच्या घोषणा करणे म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचे चव्हाण म्हणाले.

‘भक्त’ मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला: पृथ्वीराज

करोनावरील पॅकेज जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या पद्धतीवरही त्यांनी टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारला ज्या घोषणा करायच्या आहेत, त्या एकाच दिवशी करणे सहज शक्य आहे. मात्र, २० लाख कोटी रुपयांच्या तथाकथित पॅकेजची घोषणा पंतप्रधानांनी करायची आणि त्यातील तरतुदींची माहिती अर्थमंत्र्यांनी दररोज पत्रकार परिषदेत जाहीर करायची, हा प्रकार आश्चर्यकारक असल्याचे चव्हाण यांनी सांगितलं. करोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’ नाही की जिचा ‘प्रोमो’ पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’ सादर करावा, या शब्दांत चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

आत्मनिर्भर भारत ; शेतकरी, मच्छीमारांना स्वावलंबी करण्याचा संकल्प!

मुंबईत ‘या’ झोनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढेल: मलिकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular