Home लेटेस्ट मराठी न्यूज India BREAKING NEWS: आता लॉकडाऊन ३१ मे प्रयत्न : Lock Down Extended...

BREAKING NEWS: आता लॉकडाऊन ३१ मे प्रयत्न : Lock Down Extended To 31st May

संपूर्ण जगावर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोणताही देश किंवा राज्य कोरोनाच्या महामारी पासून वंचित राहिला नाहीये . त्यामुळे संपूर्ण जगात लोकडाऊनचे पालन करण्यात येत आहे . भारतात सुरू असलेले लॉक डाउन – ३ आज संपणार होते. तेवढ्यातच हे 31 मे पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .

मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत.संपूर्ण राज्यात तसेच देश मध्ये लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पार पोहोचला आहे.

तसेच , देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९० हजारांच्या जवळ पोहोचली आहे.हे अत्यंत भयावह आहे. त्यामुळे, आता देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय केन्द्र सहासनाकडून घेण्यात आला आहे.

केंद्र सकारमधील राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे सर्वत्र जरी केले आहे. तसेच देशातील संपूर्ण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यां निर्णय संदर्भातील शिथितलेबाबत मार्गदर्शन सूचना तसेच नियमावली जाहीर करण्यात येईल, असे या पत्रात नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यानी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनपूर्वी देशातील नागरिकांशी लाईव्ह संवाद साधला होता . त्यावेळी, देशावासीयांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेजी मोठी घोषणा मोदींनी केली होती . देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ्या रकमचे जगातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज असल्याचंही देशावासीयां समोर मोदींनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

तसेच त्यावेळी भाषणात, मोदींनी देशवासीयांना ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले होते. विशेष बाब अशी कि या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारला विशेष अधिकार दिल्याचं मोदींनी सांगतिल आहे . त्या अनुसार, महाराष्ट्र राज्य सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे .

महाराष्ट्रात कोरोना रुग्नांची संख्या ३० हजारांच्या पार गेली आहे. तर, राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही देशातील लॉकडाऊ ३१ मेपर्यंत वाढविल्याचे सांगितले आहे.

भारतातील लॉकडाउन जाहीर केल्यानंतर सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .आज ही संख्या 90 हजारावर आहे . उद्या ती पार करेल का याचा काही नेम नाही . आता लॉक डाऊन 4 कोरोना महामारी थांबविण्यासाठी किती कारगर होते ते बघण्यासारखे राहील .

मोदी तसेच देशातील सगळे नेते दिवसेंदिवस नवीन योजना आणत आहेत . पण या योजनांचा उपयोग घेण्यासाठी भारतातली किती जन जिवंत राहील याचा सध्यातरी काहीच नेम नाही . तुम्हाला या बाबतीत काय वाटते ? एकीकडे देशातील शासकीय नोकऱ्या संख्या कमी करत आहेत .तर दुसरीकडे 20 लाख कोटींचे पॅकेज काढत आहे सरकार नेमके काय करू इच्छिते हे सध्यातरी समजण्या पलीकडे आहे .

Webtitle : BREAKING NEWS: आता लॉकडाऊन ३१ मे प्रयत्न : Lock Down Extended To 31st May

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular