Home लेटेस्ट मराठी न्यूज BREAKING:माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद | News

BREAKING:माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद | News


भामरागड तालुक्यात कियरकोटीच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.

गडचिरोली, 17 मे: माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह एक पोलिस कॉन्स्टेबल शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. भामरागड तालुक्यात कियरकोटीच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.  गेल्या 15 दिवसांत माओवाद्यांकडून झालेला हा दुसरा हल्ला आहे.

माओवाद्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशन राबवणारे C-60 कमांडो जवान रविवारी सकाळी फसले होते. माओवाद्यांना पोलिसांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. पोलिसांनी माओवाद्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. मात्र, पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम या दोघांना वीरमरण आलं. तर तीन जखमी झाले.

हेही वाचा.. कांद्याला जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण? मंत्र्यांचा मोदींवर निशाणा

गोंगलू ओक्सा, राजू पुसली आणि दसरु कुरचामी अशी जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहीद जवानांचे पार्थिव दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले.

शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा..कर्तव्यासोबतच माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या पोलिसाला गृहमंत्र्यांचाही ‘कडक सॅल्युट’

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला होता. दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करण्यासाठी माओवाद्यांनी शक्तीशाली स्फोटकं रस्त्यावर पेरुन ठेवली होती.

चार आयडी स्फोटकांसह तीन पेट्रोल बॉम्ब जप्त करून निकामी करण्यात आले. आयडीची स्फोटके दोन कुकरमध्ये भरुन त्याला रिमोट जोडण्यात आला होता. तर पेट्रोल बॉम्बही पेरुन ठेवण्यात आले होते. जवानांनी दंतेवाडा जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करून ही स्फोटके शोधून काढली. सर्व स्फोटके निकामी करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

बारसूर लगत रस्त्याच्या बांधकामाला सुरक्षा देण्यासाठी 300 जवान निघाले होते. तत्पूर्वीच शोधमोहीमेत ही स्फोटके सापडली आहेत. आयडीची स्फोटके प्रत्येकी पाच किलोची होती आणि एंटेनाचा वापर करुन रिमोटने स्फोट घडवण्याचा अत्याधुनिक तंत्राचा माओवादी पहिल्यांदा वापर करणार होते. मोठ्या हल्ल्यांची माओवाद्यांची योजना होती. जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांची उधळली गेली आणि जवानांचे प्राण थोडक्यात बचावले.

हेही वाचा… मुलीकडे अचानक मोबाइल आला कसा? वडिलांनी जाब विचारताच जेवणात कालवलं विष!

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमे माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक शहीद झाला आहे. तर चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं होतं. या कारवाईत पोलिसांनी काही शस्त्रही जप्त केली होती.

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यातल्या मदनवाडाच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये ही चकमक झाली होती. माओवादी जंगलात लपूनन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलिस उपनिरीक्षक शहीद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चार माओवाद्यांचा खात्मा केला. या घटनांमुळे आता महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर तणाव निर्माण झाला असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

First Published: May 17, 2020 03:48 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular