Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra ashadhi wari 2020: आषाढी वारीवर करोनाचे सावट; आळंदी, देहू संस्थानांनी दिला 'हा'...

ashadhi wari 2020: आषाढी वारीवर करोनाचे सावट; आळंदी, देहू संस्थानांनी दिला ‘हा’ प्रस्ताव – pandharpur ashadi wari: new proposals for palkhis


पिंपरी: आषाढी वारीची परंपरा खंडीत न करता मोजक्याच वारकऱ्यांसमवेत पालखी पंढरपूरला नेऊ, दिंड्या-पताका मिरवणार नाही किंवा वाखरी ते पंढरपूर असा एकच दिवसाचा पायी प्रवास करू असे प्रस्ताव आळंदी आणि देहू संस्थांनांनी राज्य सरकारला सादर केले आहेत. शासन निर्णयाच्या अधीन राहूनच पालखी सोहळा साजरा करू, अशी ग्वाही विश्वस्तांनी दिली आहे.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याबाबत ३० मे रोजी निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्या अनुशंगाने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी राज्य सरकारला नवे प्रस्ताव सादर केले आहेत. नियम आणि अटींना अधीन राहून पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी, असे यात स्पष्ट केले आहे.

पालखी सोहळ्याची वैभवशाली परंपरा खंडीत होऊ नये, अशी अखंड वारकरी संप्रदायाची मनोमन इच्छा आहे. मात्र, राज्यावरील करोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. पुणे जिल्हा रेडझोनमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये, अशी असंख्य वैष्णवांची भूमिका आहे. सामाजिक बांधिलकीचे जतन करून पालखी सोहळ्याची परंपरा जतन करता येईल का, या अनुशंगाने सरकारकडून सूचना मागविण्यात येत आहेत.

राज्यातील प्रमुख संस्थानांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जात आहे. संबंधित पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रशासनाची बाजू पडताळली जात आहे. त्यामुळेच अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्याबाबत वारकरी संप्रदायामध्ये मोठी उत्सुकता आहे. पालखी सोहळ्याची परंपरा खंडीत होणार नाही, अशी तमाम वारकऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी सोहळ्यात सहभागी न होण्याची त्यागी वृत्ती अंगिकारण्याची हमी दिली आहे. त्याला प्रतिसाद देऊन सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. राज्य सरकारचा निर्णय अंतिम राहील, असेही दोन्ही संस्थानांच्या प्रमुख प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आषाढी वारीचे यंदाचे स्वरुप कसे असावे, याबाबत देहू आणि आळंदी संस्थानांचे प्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, मालक, चोपदार, प्रमुख दिंडीकरी, विणेकरी यांच्यातील बैठकांचे सत्र चालूच आहे. संचारबंदी कायम राहिल्यास आणि नियम शिथिल झाल्यास सोहळा कसा आयोजित केला जाईल, या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार केला जात आहे. मानवजातीचे हित नजरेसमोर ठेवून आणि संत वचनाला अनुसरूनच सोहळ्याचे नियोजन केले जाईल, याबाबत एकमत दिसून येत आहे. त्यामुळे शासन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रस्तावातील ठळक मुद्दे

– पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांसोबत व्हावा
– पालखीने अतिशय साध्या पद्धतीने प्रस्थान ठेवावे
– सोहळा वाटेत कोठेही दर्शनासाठी थांबणार नाही
– प्रस्थान मंदिरांमध्ये होऊन पालख्या येथेच थांबतील
– दशमीच्या दिवशी पादुका पंढरपूरला नेण्यात येतील

देहू-आळंदी पालखी प्रस्थानाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा चालू आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही शनिवारी (16 मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दिंड्या-पताका न मिरविता केवळ मुखाने नामस्मरण करून केवळ पाच वारकरी वाखरीपर्यंत पायी प्रवास करतील. दशमीच्या दिवशी पादुका वाखरीला नेण्यात येतील. तेथून मोजकेच लोक पंढरपूरमध्ये जातील. चंद्रभागेमध्ये पादुकांना स्नान घालण्यात येईल. सोहळा संपन्न होईल, असा नवीन प्रस्ताव दिला आहे.
– माणिक महाराज मोरे (पालखी सोहळा प्रमुख)

पवार, ठाकरेंची शिष्टाई यशस्वी; बिहार, पश्चिम बंगालसाठी सुटली पहिली ट्रेनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular