Home लेटेस्ट मराठी न्यूज World Anti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार university of birmingham developed...

Anti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार university of birmingham developed anti covid nasal spray ready for use in humans gh | Coronavirus-latest-news


गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा (coronavirus) धोका टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझरनंतर आता सर्वसामान्यांसाठी आणखी एक शस्त्र उपलब्ध झालं आहे.

लंडन, 20 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) आपण सर्वसामान्यांच्या हातात सध्या मास्क आणि सॅनिटायझर ही शस्त्र आहेत. आता यामध्ये आणखी एका शस्त्राचा समावेश झाला आहे, हे शस्त्र म्हणजे Anti-COVID Nasal Spray. बर्मिंघम युनिव्हर्सिटीने (University of Birmingham) हे अँटी-कोव्हिड नेझल स्प्रे तयार केलं आहे.

युनिव्हर्सिटीच्या हेल्थकेअर टेक्नॉलॉजीज इन्स्टिट्युटमधील पथकानं यूके, युरोप आणि अमेरिकेतील नियामक संस्थांनी पूर्वीच मंजूर केलेलं साहित्य वापरून हा नेझल स्प्रे तयार केला आहे. हे साहित्य आधीच वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि अगदी अन्न उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. याचा अर्थ असा आहे की ही उत्पादनं वापरून तयार करण्यात आलेला हा स्प्रे बाजारात आणण्यासाठी तयार आहे. एरवी केल्या जाणाऱ्या जटिल कार्यपद्धती मोठ्या प्रमाणात सोप्या झाल्या आहेत. म्हणून हा स्प्रे लवकर उपलब्ध होऊ शकेल.

हा अभ्यास अजून जर्नलमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलेला नाही. मात्र स्प्रेमध्ये वापरलेलं सोल्युशन कोरोनाचा संसर्ग परसरवणाऱ्या सेल कल्चरला 48 तासांपर्यंत रोखून ठेवतं, असं संशोधकांनी सांगितलं. पेपरचे प्रमुख लेखक डॉ. रिचर्ड मोक्स म्हणाले,  हा स्प्रे सहजपणे उपलब्ध उत्पादनांपासून बनवला गेला आहे जो आधीपासूनच अन्न आणि औषधांमध्ये वापरला जात आहे आणि आम्ही हेतूपूर्वक तसंच डिझाइन केलं आहे. याचा अर्थ असा की योग्य भागीदारांसह आम्ही काही आठवड्यातच मोठ्या प्रमाणात या स्प्रेचं उत्पादन सुरू करू शकू.

हे वाचा – तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; मिळणार आपात्कालीन मंजुरी

हा नेझल स्प्रे दोन प्राथमिक मार्गाने काम करतो. प्रथम तो नाकाच्या आत विषाणूला पकडतो आणि त्याच्याभोवती नाकातच वेष्टन तयार करतो. त्यानंतर नाक शिंकरून विषाणू नष्ट केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे व्हायरस स्प्रेच्या वेष्टनात विषाणू लपेटला गेला असल्याने तो शरीरात जास्त प्रमाणात जात नाही. याचा अर्थ शरीरातील विषाणूचे प्रमाण कमी होईल. तसंच संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्या किंवा खोकल्याद्वारे दुसऱ्याकडे प्रसारित झाला तरीही त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.

संशोधक प्रोफेसर लियाम ग्रोव्हर म्हणाले जरी आपल्या नाकांमध्ये प्रतिदिन हजारो लीटर हवा फिल्टर होत असेल. मात्र आपल्याला संक्रमणापासून फारसं संरक्षण मिळत नाही आणि बहुतेक वायुजनित विषाणू नेझल पॅसेजमधून आत आल्यावर आपल्या शरीरात पसरतात. आम्ही तयार केलेल्या स्प्रेमुळे नेझल पॅसेजही संरक्षित होतो आणि विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे जाणं देखील प्रतिबंधित होतो.

हे वाचा – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर आणखी एक संकट! हे औषध न वापरण्याचा WHO चा सल्ला

ज्या ठिकाणी शक्यतो गर्दी टाळता येत नाही अशा ठिकाणी हा स्प्रे विशेषत: उपयुक्त ठरू शकेल. अशा ठिकाणी हा स्प्रे वापरल्यावर रोगाचा प्रसार कमी होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.


Published by:
Priya Lad


First published:
November 20, 2020, 11:52 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular