Home Uncategorised aatmanrirbhar bharat abhiyan: 'आत्मनिर्भर भारत' अभियानावर चित्रपट येणार - film on pm...

aatmanrirbhar bharat abhiyan: ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानावर चित्रपट येणार – film on pm modi aatmanrirbhar bharat abhiyan


मुंबईः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. अजूनही करोनाची साथ अटोक्यात आणण्यात भारताला यश आलं नाहीये. अर्थव्यवस्थेपुढे करोनाने मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सर्वच क्षेत्रात करोनामुळं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केलीये. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर अधिक करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता यावर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाह जिंदगी’ असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेता संजय मिश्रा आणि विजय राज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाची कथा स्वदेशी सामानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे.

वाचाः कर्जबाजारी टीव्ही कलाकाराची आत्महत्या

मेक इन इंडिया या संकल्पनेभोवती या चित्रपटाची कथा फिरते. वाह इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश सिंह यादव करणार आहेत तर, अशोक चौधरी चित्रपटाचे निर्माते आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत.

वाचाः लग्नाच्या अफवांमुळं प्रचंड मनस्ताप झाला; सोनालीचा खुलासा

‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेवर आधारित सुई- धागा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular