Home लेटेस्ट मराठी न्यूज 9000 हून कमी किंमतीत 5 कॅमेरावाल जबरदस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स...

9000 हून कमी किंमतीत 5 कॅमेरावाल जबरदस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स smartphone infinix-hot-10-launched-in-india-latest budget smartphone with-5-cameras know its price and specifications mhkb | Technology


या स्मार्टफोनची विक्री 29 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध असणार आहे. अनेक ऑफर्स वापरल्यास हा फोन चांगल्या सूटमध्ये खरेदी करता येणार आहे.

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने भारतात Infinix Hot 10 स्मार्टफोन, लो बजेट वेरिएंट लाँच केलं आहे. या फोनमध्ये कमी बजेटमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत 8999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

ऑफर्स –

या स्मार्टफोनची विक्री 29 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध असणार आहे. फोन कोटक बँकच्या क्रेडिट-डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास 10 टक्के, HSBC क्रेडिट कार्डवर 10 टक्के, फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के, ऍक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर 5 टक्के सूट मिळणार आहे. तसंच हा फोन 750 रुपये नो कॉस्ट EMI वरही खरेदी करता येणार आहे.

(वाचा – चिनी सामनावरील बॅननंतरही ‘या’ चायनिज स्मार्टफोनची भारतात सर्वाधिक विक्री)

Infinix Hot 10 स्पेसिफिकेशन्स –

– 6.78 इंची एचडी डिस्प्ले (720×1640 पिक्सेल)

– पंचहोल कटआउट

– Android 10 वर आधारित XOS 7 वर काम करतो

– मीडियाटेक हीलियो G70 प्रोसेसर

– 5,200mAh बॅटरी

– मायक्रो-यूएसबी पोर्ट 10 W चार्जिंग सपोर्ट

– फेस अनलॉक सपोर्ट

– बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर

– वायफाय, 4 G, ब्लूटूथ,

– 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक

(वाचा – WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा)

कॅमेरा –

फोनमध्ये क्वाड-रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सल आहे. 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर, 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि एक लो लाईट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

(वाचा – ‘आओ करें चीनी कम’; Micromax 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार स्मार्टफोन)

(वाचा – देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य; UIDAI ने दिली संपूर्ण माहिती)


Published by:
Karishma Bhurke


First published:
October 24, 2020, 4:23 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular