Home लेटेस्ट मराठी न्यूज 8 दिवसांनंतरही माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर, तज्ज्ञ डॉक्टरांचा घेतला जातोय सल्ला chhattisgarh...

8 दिवसांनंतरही माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर, तज्ज्ञ डॉक्टरांचा घेतला जातोय सल्ला chhattisgarh former cm ajit jogis condition not improved even after 8 days mhpl | National


8 दिवसांनंतरही छत्तीसगडचे (chhattisgarh) माजी मुख्यमंत्री अजित जोगी (ajit jogi) यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झालेली नाही.

सुरेंद्र सिंह/ रायपूर, 17 मे : छत्तीसगडचे (Chhattisgarh) माजी मुख्यमंत्री अजित जोगी (Ajit jogi) यांच्या प्रकृतीत 8 दिवसांनंतरही काहीच सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनकच आहे. आता देशविदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो आहे. रायपूरमधील श्रीनारायण रुग्णालयात अजित जोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णालयाचे डॉ. सुनील खेमका यांच्याद्वारे अजित जोगी यांचं मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं आहे, त्यानुसार जोगी यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर आहे. ते कोमातून बाहेर पडले नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

74 वर्षीय अजित जोगी यांना 9 मे रोजी हार्ट अॅटक आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. पंकज यांच्या नेतृत्वात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, त्यांचं हार्ट, ब्लड प्रेशर आणि युरिनचं आऊटपूट नियंत्रणात आहे.

15 मे रोजी श्रीनारायणा रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. छत्रपाल सिंह साहू आणि डॉ. विवेक त्रिपाठी यांच्याव्यतिरिक्त न्यूरोलॉजिस्ट डॉ. संजय शर्मा आणि डॉ. नचिकेत दीक्षित यांनी अजित जोगी यांच्या मेंदूची तपासणी केली.

डॉक्टरांच्या टीमने सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विजय कुमार शर्मा यांच्या टेलिकॉन्फ्रन्सिंगद्वारे जोगी यांच्या आरोग्याबाबत चर्चा केली. तर 16 मे रोजी बंगळुरूतील रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. संजीन सिंहा यांच्याशी संपर्क साधला.

डॉ. संजीव सिंहा आणि अन्य डॉक्टरांनी सांगितलं की, अजित जोगी यांच्यावर सध्या सुरू असलेले उपचार कायम ठेवणार आहे. अजित जोगींच्या मेंदूला कार्यरत करण्यासाठी इन्फ्रारेड रेडिएशनने उपचार केले जात आहेत, शिवाय ऑडिओ थेरेपी दिली जात आहे. याअंतर्गत त्यांना त्यांची आवडती गाणी ऐकवली जात आहे. मात्र तरीही त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

संपादन – प्रिया लाड

First Published: May 17, 2020 03:04 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular