Home लेटेस्ट मराठी न्यूज 5 वर्षाच्या चिमुरडीच्या कलेसमोर भलेभले झाले गारद; VIDEO पाहून तुम्ही व्हाल थक्क...

5 वर्षाच्या चिमुरडीच्या कलेसमोर भलेभले झाले गारद; VIDEO पाहून तुम्ही व्हाल थक्क ! five-years-old-talented-girl-playing-drum-like-pro-video-viral-mhaa | Viral


5 वर्षाच्या चिमुरडीने असा काही अफलातून ड्रम वाजवला आहे की तिच्यासमोर भले-भलेही गारद होतील. या सूपर चाईल्डचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. तिची कला एकदा पाहाच.

मुंबई, 26 ऑक्टोबर: काही माणसं जन्मत: जबरदस्त टॅलेंट घेऊन येतात. त्यांच्या बालवयातील करामतींनी मोठी माणसंही थक्क होतात. असंच काहीसं घडलं आहे एका 5 वर्षाच्या चिमुरडीच्या बाबतीत. ही चिमुरडी भल्या-भल्यांनाही गारद करेल अशा आवेशात ड्रमसेट वाजवत आहे. अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेअर रेक्स चॅपमन (Rex Chapman)ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये या चिमुरडीने जी कला दाखवली आहे, त्यामुळे पाहणारा माणूस थक्क होऊन जातो.

ड्रम वाजवताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही अतिशय सुंदर दिसत आहेत. रेक्स चॅपमनने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्याखाली 5 वर्षाच्या मुलीची (5-years-old. Unreal) अविश्वसनीय कला असं कॅप्शन दिलं आहे. या मुलीचं नाव समजू शकलेलं नाही. पण तिचा ड्रम वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

या चिमुरडीचा व्हिडीओ मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरही शेअर झाला. आणि बघता बघता तिच्या व्हिडीओ 5.4 लाख व्ह्यूज आणि 17,200 लाइक्स आले. तिचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहलं आहे, “लहान मुलांच्या हातात खेळणी नाही वाद्य द्यायला हवीत. ह्या व्हिडीओमधील मुलगी एखादी जादू नाहीये. तर योग्य वयात योग्य गोष्ट हाती लागली तर मुलं त्याचं कसं सोनं करू शकतात याचं उदाहरण आहे.”


Published by:
Amruta Abhyankar


First published:
October 26, 2020, 7:51 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular