Home मनोरंजन 39व्या वर्षी लग्न करूनही अभिनेत्री म्हणते 'आई व्हायची घाई नाही'; 34व्या वर्षीच...

39व्या वर्षी लग्न करूनही अभिनेत्री म्हणते ‘आई व्हायची घाई नाही’; 34व्या वर्षीच केलं होतं हे काम Actress-mona-singh-freez-egg-for-baby-at-age-of-34-said-in-interview-mhaa | News


‘जस्सी जैसी कोई’ नही फेम अभिनेत्रीने लग्नाआधीच बाळासाठी तयारी करुन ठेवली होती. त्यामुळे लग्न करुनही बाळाला जन्म देण्याची घाई करणार नसल्याचं ती म्हणते.

मुंबई, 21 नोव्हेंबर: ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मोना सिंह (Mona singh). या अभिनेत्रीने गेल्याच वर्षी लग्न केलं. लग्नाच्या वेळी तिचं वय 39 होतं. मोनाच्या नवऱ्याचं नाव श्याम गोपालन आहे. तो इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. एवढ्या उशिरा लग्न करुनही आई होण्याची घाई नाही असं मोना म्हणते कारण मोनाने वयाच्या 34व्या वर्षीच बाळासाठी एग्ज फ्रिजिंग करुन ठेवलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोना म्हणाली, मी आधीच माझ्या होणाऱ्या बाळासाठी एग्ज फ्रिजिंग करुन ठेवलं आहे. ‘मला माझ्या पार्टनरसोबत खूप वेळ घालवायचा आहे. सारं जग फिरायचं आहे. या आधी मी माझ्या कुटुंबासोबत फिरायचे आता मला माझ्या नवऱ्यासोबत फिरायचं आहे असं ती म्हणते. ’

गर्भधारणेसाठी आधीच एग्ज फ्रिजिंग करुन ठेवणारी ती काही पहिली अभिनेत्री नाही. या आधी डायना हेडन ही पहिली भारतीय सेलेब्रिटी जिने अशा पद्धतीने फ्रीज केलेल्या बीजांडापासून मुलांना जन्म दिला. मोनाने स्पष्ट केलं आहे की, तिने 34 वर्षांची असताना एग्ज फ्रिंजिग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिने कामातूनही 2 महिन्यांचा ब्रेक घेतला. मोना म्हणते, ’माझ्या आईला मी जेव्हा या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा ती फारच खूश झाली होती. आता मला स्वतंत्र असल्यासारखं वाटत आहे.’

एग्ज फ्रिजिंग म्हणजे काय?

या प्रक्रियेत महिलेला 10 दिवस हार्मोन्सचं इंजेक्शन घ्यावं लागतं.

इंजेक्शनमुळे महिलेच्या शरीरात त्यावेळी बीजांड तयार होतात.

एनेस्थेशिया देऊन महिलेच्या शरीरातून अंडी बाहेर काढली जातात.

या संपूर्ण प्रक्रियेला 10 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो.

त्यानंतर बीजांड फ्रीजमध्ये गोठवली जातात.

महिलेलेला जेव्हा बाळाला जन्म द्यायचा असेल तेव्हा त्यांचा वापर केला जातो.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोना सिंह, आमिर खान आणि करीना कपूरसोबत दुसरा सिनेमा करणार आहे. लाल सिंह चड्ढा या सिनेमामध्ये ती झळकणार आहे. या आधी मोनाने त्यांच्यासोबत थ्री इडियट्स सिनेमात काम केलं होतं. मोनाने कहने को हमसफर है, ये मेरी फैमिली, मिशन ओवर मार्स या शोजमध्येही काम केलं आहे.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 21, 2020, 7:36 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular