Home लेटेस्ट मराठी न्यूज 10 वर्षात दुप्पट होतील तुमचे पैसे, फायद्याची आहे सरकारी गॅरंटीची ही पोस्ट...

10 वर्षात दुप्पट होतील तुमचे पैसे, फायद्याची आहे सरकारी गॅरंटीची ही पोस्ट ऑफिस योजना post office scheme get double guaranteed return of your investment in kisan vikas patra kvp mhjb | News


जर तुम्ही पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकदाराला या योजनेत चांगला परतावा तर मिळतोच याशिवाय सरकारी गॅरंटी देखील आहे, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील.

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: जर तुम्ही पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) किसान विकास पत्र (KVP Kisan Vikas Patra) या योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदाराला या योजनेत चांगला परतावा तर मिळतोच याशिवाय सरकारी गॅरंटी देखील आहे, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील. या योजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार किसान विकास पत्राची मॅच्यूरिटी अवधी 124 महिने आहे. म्हणजेच या योजनेमध्ये ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील.

काय आहे किसान विकास पत्र?

-हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते.

-तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. 2 जणांच्या नावावर देखील याची खरेदी करता येईल.

तीन प्रकारे खरेदी करता येईल KVP

-सिंगल होल्डर टाइप सर्टिफिकेट- हे प्रमाणपत्र स्वत:साठी किंवा कोणत्याही अल्पवयीन मुलामुलीसाठी खरेदी करता येईल

-जॉइंट A अकाऊंट सर्टिफिकेट- दोन प्रौढ व्यक्ती याची खरेदी संयुक्त स्वरुपात करु शकतील. यामध्ये दोन्ही धारकांचे पेमेंट होते किंवा जो हयात असेल त्याचे

(हे वाचा-LPG गॅस घरगुती सिलेंडरचे अशाप्रकारे करा ऑनलाइन बुकिंग, मिळेल 50 रुपयांनी स्वस्त)

-जॉइंट B अकाऊंट सर्टिफिकेट- दोन प्रौढ व्यक्ती याची खरेदी संयुक्त स्वरुपात करु शकतील. यामध्ये कोणत्याही एका धारकाचे पेमेंट होते किंवा जो हयात असेल त्याचे

कोण करू शकतं गुंतवणूक?

यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. ज्याची देखरेख पालकाकडून केली जाते. KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल.

यामध्ये किती मिळतोय व्याजदर?

आर्थिक वर्ष 2021 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी अर्थात सप्टेंबरपर्यत KVP मध्ये व्याजदर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला होता.  या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील, जर तुम्ही एकरकमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख रुपये मिळतील. या स्कीमचा मॅच्यूरिटी पीरिएड 124 महिन्यांचा आहे.

(हे वाचा-मोठी बातमी! शेतकऱ्यांना नाही मिळणार व्याजावरील व्याज माफ योजनेचा फायदा)

केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित केले जाऊ शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशन सुविधा देखील आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी केले जाते.

द्यावं लागेल PAN आणि आधार

यासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे.

(हे वाचा-यावर्षी सोनं सर्वाधिक महागलं, दिवाळीत सोन्यातून फायदा मिळवण्याची संधी?)

यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे पण मनी लाँड्रिंगचा धोका टाळण्यासाठी 2014 पासून 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही  10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर इनकम प्रुफ देखील द्यावा लागेल, जसं की ITR, सॅलरी स्लीप आणि बँक स्टेटमेंट.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
October 31, 2020, 8:47 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular