Home लेटेस्ट मराठी न्यूज हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची झाली अँजिओप्लास्टी, प्रकृतीबाबत स्वत: दिले अपडेट kapil...

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची झाली अँजिओप्लास्टी, प्रकृतीबाबत स्वत: दिले अपडेट kapil dev undergoing angioplasty on recovery mode thanked well wisher mhpg | News


शुक्रवारी रात्री उशिरा कपिल देव यांच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा कपिल देव यांच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान 61 वर्षीय कपिल देव यांनी ट्वीट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

कपिल देव यांनी ट्वीट करत, प्रकृती ठीक असून. रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. दरम्यान, रुग्णालयाने आपल्या सुरुवातीच्या हेल्थ बुलेटिनमध्ये छातीत दुखण्याचा उल्लेख केला होता, त्यानंतर ताज्या आरोग्य बुलेटिनमध्ये, “कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याची तपासणी केली गेली आणि रात्री तातडीने अँजिओप्लास्टी केली गेली”ö असे सांगितले. दरम्यान आता, त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

कपिल देव यांच्या तब्येतीसाठी सगळेच जण प्रार्थना करत आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन यांनीही कपिल देव यांना लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना केली आहे.

त्यानंतर कपिल देव यांनी ट्वीट करून सर्वांचे आभार मानले आणि रिकव्हरी प्रकिया सुरू झाली असून लवकरच बरा होईल असे सांगितले.

कपिल देव यांचे शानदार करिअर

1978मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कपिल देव यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत. कपिल देव यांनी न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडली यांना सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम मोडला होता. कपिल देव यांच्या नावावर 434 विकेट आहेत. भारताकडून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम आजही कपिल देव यांच्या नावावर आहे.

चॅम्पियन कर्णधार

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने 43 धावांनी पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 183 धावा केल्या होत्या, मात्र कपिल देव यांच्या शानदार कामगिरीमुळे वेस्ट इंडीजचा मजबूत संघ केवळ 140 धावा करू शकला.


Published by:
Priyanka Gawde


First published:
October 24, 2020, 8:43 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular