Home लेटेस्ट मराठी न्यूज World स्मार्टवॉचसारखी उपकरणं कोरोना रुग्णाचा शोध घेऊ शकतील? university-of-sydney-joins-international-efforts-to-determine-if-wearables-can-detect-covid-gh | News

स्मार्टवॉचसारखी उपकरणं कोरोना रुग्णाचा शोध घेऊ शकतील? university-of-sydney-joins-international-efforts-to-determine-if-wearables-can-detect-covid-gh | News


कोरोना (Corona Virus)च्या साथीला अस्तित्वात येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात कोरोनावर बराच रिसर्च करण्यात आला आहे. लवकरच हे संशोधन एका वेगळ्या गोष्टीकडे वळण घेणार आहे.

सिडनी, 21 नोव्हेंबर : कोरोना (Corona Virus)च्या साथीला अस्तित्वात येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात कोरोनावर बराच रिसर्च करण्यात आला आहे. लवकरच हे संशोधन एका वेगळ्या गोष्टीकडे वळण घेणार आहे. सिडनी विद्यापीठातील संशोधक हे या संशोधनाचा भाग आहेत. ते या गोष्टीवर संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहे की सध्याच्या काळात जास्त वापरले जाणारे स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स यांच्यासारखी उपकरणं कोरोना रुग्ण शोधू शकतात का?

एखाद्या व्यक्तीचे हृदयाचे ठोके, तसेच शारीरिक हालचाली, चालण्याची गती या बाबतीत ही उपकरणे माहिती देतात. यासह covid-19 चे संकेत सुद्धा या उपकरणाद्वारे मिळू शकतील का, हे या अभ्यासात शोधले जाणार आहे. तसेच व्यायाम, आहार, झोप, मद्यपान या सर्व गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे सुद्धा या संशोधनातून कळू शकेल.

हा अभ्यास अमेरिकेतील स्क्रिप्स रिसर्च, फिटबिट आणि स्टॅनफोर्ड मेडिसिनने सुरु केलेल्या रिसर्च कन्सॉर्शियमचा एक भाग आहे. जामध्ये फिटबिट किंवा स्मार्टवॉचयासारख्या इतर उपकरणांचा डेटा वापरला जाणार आहे आणि यातून काही माहिती मिळते का याचा शोध घेतला जाणार आहे.

सिडनी विद्यापीठातील प्राध्यापक इमॅन्युएल स्टामाटाकीस म्हणाले की, या सर्व डेटामधून काही उपयुक्त माहिती मिळते का याच्यावरती आम्ही अभ्यास करत आहोत.

सध्या आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोकं स्मार्टवॉचसारखी उपकरणं वापरतात, ज्यात हृदयाचे ठोके, चालण्याची गती या गोष्टी अगदी सहजरित्या समजतात. याच प्रकारे या उपकरणांनद्वारे जर covid-19 शोधला होऊ शकला, तर आपल्या सर्वांसाठी ते अधिकच उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच या गोष्टीचा शोध घेतला जाणार आहे. स्मार्टवॉच सारख्या या उपकरणातून अनेक बदल आपल्याला कळून येतात. आपल्या हृदयाचे ठोके योग्य प्रकारे चालत आहेत का, नाही याबाबतीत आपल्याला लगेचच माहिती मिळते. तसेच दिवसभरात आपण किती पावले चाललो. या बाबतीत सुद्धा आपल्याला लगेचच कळतं. याच प्रकारे जर covid-19 आजाराबाबत आपल्याला लगेचच माहिती मिळाली, तर ते आपल्याला अधिक उपयुक्त ठरेल.

ॲपल वॉचसारख्या उपकरणातून मिळालेल्या डेटामधून कधीकधी आपल्याला आपले आरोग्य कितपत सुदृढ आहे, या बाबतीत अंदाज लावण्यास मदत होते. याचाच वापर covid-19 शोधण्यात होऊ शकतो की नाही, याबाबत आता संशोधन सुरू करण्यात येणार आहे. तसंच माय डेटा हेल्प ॲपमुळे वापरकर्त्यांना आरोग्याविषयीची माहिती तसेच ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जाहीर केलेल्या हेल्थ पॉलिसी विषयी माहिती मिळते.


Published by:
Shreyas


First published:
November 21, 2020, 9:05 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular