Home शहरं Mumbai सोलापुरातून मुंबईत आले लालपरीच्या सेवेला, पण उपचार न मिळाल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू...

सोलापुरातून मुंबईत आले लालपरीच्या सेवेला, पण उपचार न मिळाल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू St bus driver dies due to untimely treatment kurla at mumbai mhss | Mumbaiमुंबईची लोकल सेवा ठप्प असल्यामुळे बेस्टने अतिरिक्त गाड्या सोडल्या आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडू नये म्हणून 1000 एसटीच्या गाड्या सेवेत आल्या आहेत.

मुंबई, 01 नोव्हेंबर : गेल्या सात महिन्यांपासून मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local ) सर्वसामान्यांसाठी अजूनही बंद आहे. त्यामुळे  बेस्टच्या (Best Bus) मदती एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation

) धावून आले आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी (St Workers) मुंबईत कर्तव्यावर आहे. मुंबईत सोलापूर (Solapur) विभागातून बेस्टच्या मदतीला आलेले मंगळवेढा आगरचे वाहनचालक भगवान गावडे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक सकाळ दिलेल्या वृत्तानुसार, भगवान गावडे (वय 48) हे कुर्ला इथं एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांना अनेक दिवसांपासून मूळव्याधीचा त्रास होता. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. गावडे यांना उपचार मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. पण, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गावडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा पेटला, आक्रमक ग्रामस्थांनी केली ऑफिसची तोडफोड

मुंबईची लोकल सेवा ठप्प असल्यामुळे बेस्टने अतिरिक्त गाड्या सोडल्या आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडू नये म्हणून 1000 एसटीच्या गाड्या सेवेत आल्या आहेत. राज्यभरातून एसटीचे कर्मचारी हे मुंबईत सेवेवर रूजू झाले आहे. सोलापूर विभागातून 48 कर्मचारी 26 ऑक्टोबर रोजी मुंबईत दाखल झाले आहे. यामध्ये मंगळवेढा डेपोचे भगवान गावडे यांचाही समावेश होता.

भगवान गावडे हे प्रतिक्षानगर ते बोरिवली कर्तव्यावर होते. गावडे यांना मुळव्याधीचा त्रास होता. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून अधिक त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. एसटीच्या अधिकाऱ्यांची याबद्दल पुढे माहिती पुरवली. पण, त्यांच्या उपचाराची कुणीही दखल घेतली नाही.  अखेर हॉटेलमध्ये असताना गावडे यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. गावडे यांच्या मृतदेह हा भाभा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. कुर्ला पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

IPL 2020 : शेवटच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकला, प्ले-ऑफसाठी पंजाबला विजय हवाच

दरम्यान,  ‘गावडे यांनी आपल्या आजाराबद्दल मंगळवेढा आगार व्यवस्थापकांना सांगितले होते. तरी सुद्धा त्यांना मुंबईला पाठवण्यात आले होते. मुंबई जेवणाची गैरसोय झाल्यामुळे गावडे यांना त्रास होत होता’, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. तर, गावडे यांचा मृत्यू हा एसटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. मुंबई आलेल्या कर्मचाऱ्यांची योग्य देखभाल केली जात नाही.  त्यामुळे दोषींवर कडक करावी, अशी मागणी  महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.


Published by:
sachin Salve


First published:
November 1, 2020, 4:16 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular