Home लेटेस्ट मराठी न्यूज सोयाबीन मळणी यंत्रात अडकून महिलेचे शीर झाले धडा वेगळे, उस्मानाबादेतील घटना Womans...

सोयाबीन मळणी यंत्रात अडकून महिलेचे शीर झाले धडा वेगळे, उस्मानाबादेतील घटना Womans head gets stuck in soybean threshing machine shocking incident in Osmanabad mhss | Crimeतुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी गावाच्या शिवारात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मळणी चालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद, 31 ऑक्टोबर : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.  सोयाबीन मळणी यंत्रात (soybean threshing machine) अडकून  शेतमजूर महिलेचे शीर धडा वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी गावाच्या शिवारात ही घटना घडली आहे.  निलावती भगवान मारकड असं मृत महिलेचे नाव आहे. निलावती मारकड  या रोजनदारीवर सोयाबीन मळणीचे काम करत होत्या. नेहमी प्रमाणे शुक्रवारी त्यांनी सोयाबीनची मळणी काढण्याचे काम हाती घेतले होते.

फटाका स्टीलच्या ग्लासमध्ये घालून फोडला; 9 वर्षाच्या मुलाच्या शरीराच्या चिंधड्या

दरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक मळणी यंत्रात निलावती या अडकल्या. त्यामुळे काही कळायच्या आत निलावती यांचे शीर धडा वेगळे झाले. यात निलावती यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

शेतमजूर आणि निलावती यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि निलावती यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

कोरोना काळात 4 या पॉलिसी असणं अत्यंत आवश्यक, संकटकाळात ठरतील फायदेशीर

दरम्यान, मृत  निलावती मारकड यांच्या नातेवाईकांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  मळणी चालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.


Published by:
sachin Salve


First published:
October 31, 2020, 11:54 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular