Home मनोरंजन 'सावरकरांना तुरुंगात टाकले त्याप्रमाणे मलाही..', Intolerance वर बोलून आमिरलाही कंगनाची कोपरखळी actress...

‘सावरकरांना तुरुंगात टाकले त्याप्रमाणे मलाही..’, Intolerance वर बोलून आमिरलाही कंगनाची कोपरखळी actress kangana ranaut reaction on complaint filed against her in mumbai actress criticize aamir khan on comment about intolerance mhjb | News


अभिनेत्री कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल झाली आहे त्याचप्रमाणे तिला चौकशीकरता मुंबई पोलिसांनी समन देखील धाडला आहे. याप्रकरणी कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई, 23 ऑक्टोबर : अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुधवारी न्यायपालिकेविरूद्ध ‘दुर्भावनायुक्त आणि अपमानजनक’ ट्वीट पोस्ट केल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर त्याआधी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून तिच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल होती, त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंगना रणौत आणि तिच्या बहिणीला पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. यावर कंगना काही प्रतिक्रिया देईलच अशी अपेक्षा सर्वांनाच होती. दरम्यान शुक्रवारी कंगनाने याबाबत एक ट्वीट केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ट्वीटमध्ये अभिनेत्रीने अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ला लक्ष्य करत त्याला एक सवाल केला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘ज्याप्रकारे राणी लक्ष्मीबाईंचा किल्ला तोडला होता, ज्याप्रकारे सावकरांना बंड केल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले होते त्याचप्रमाणे मलाही तुरुंगात टाकण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. इंटॉलरन्स गँगमधून जाऊन कुणीतरी विचारा त्यांनी किती कष्ट सहन केले आहेत या असहिष्णू देशात?’

(हे वाचा-46 व्या वर्षीही हॉट दिसणारी मलायका प्रत्यक्ष आयुष्याही आहे तितकीच बोल्ड)

कंगनाने याआधी देखील एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये तिने तिच्यावर दाखल केलेल्या तक्रारीबाबत संताप व्यक्त केला होता. त्यावेळी तिने असे म्हटले होते की, ‘वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.’

(हे वाचा-PHOTO: एकेकाळी ब्रेस्ट सर्जरी करायला नव्हते पैसे, अन् रातोरात झाली स्टार)

याप्रकरणी अंधेरी कोर्टात अभिनेत्रीविरोधात वकील वकील अली कासिफ खान देशमुख यांनी देशद्रोह आणि तिच्या ट्वीट्समधून धार्मिक समुहांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ही बॉलिवूड अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदा आणि अधिकृत सरकारी संस्था यांचा आदर करत नाही आणि तिने न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे.

कंगनाविरोधात पहिली याचिका ‘फिटनेस ट्रेनर’ मुनव्वर अली सय्यद यांनी दाखल केली होती. यावर वांद्रे दंडाधिरारी न्यायालयाने कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होत. या तक्रारीबाबतच मुंबई पोलिसांना कंगनाला समन बजावले आहेत. मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना बुधवारी समन जारी चौकशीकरता बोलवले आहे. तिच्या वक्तव्यातून दोन समाजात दुही निर्माण केल्याचा आरोप अभिनेत्रीवर केला जात आहे.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
October 23, 2020, 10:49 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular